…अन् अनिल अंबानींचा तुरुंगवास टळला

anil-ambani
नवी दिल्ली – टेलिकॉम साहित्य बनवणारी दिग्गज स्वीडिश कंपनी एरिक्सनला अनिल अंबानींच्या रिलायन्स कम्युनिकेशन्सने त्यांची ४६२ रुपयांची थकबाकी अदा केली असल्याची माहिती एरिक्सननेच दिली आहे. सर्वोच्च न्यायालयाने मागील महिन्यात अनिल अंबानी यांच्या आरकॉम आणि त्यांच्या दोन संचालकांना ४ आठवड्याच्या आत एरिक्सनला ४५० कोटी रूपयांची भरपाई करावी किंवा न्यायालयाच्या अवमाननेप्रकरणी तीन महिन्यांचा कारावास भोगावा असे म्हटले होते. एरिक्सनचे ५७१ कोटी रुपये आरकॉमने थकवले होते.

सर्वोच्च न्यायालयाने अनिल अंबानी यांना मागील महिन्यात २० फेब्रुवारीला जाणूनबुजून आदेशाचे उल्लंघन करणे आणि एरिक्सनची थकबाकी न देता न्यायालयाचा अवमान केल्याचे सिद्ध झाले होते. तत्पूर्वी, न्यायालयात एरिक्सनने आपली बाजू मांडताना अनिल अंबानींच्या रिलायन्स समूहाकडे राफेल व्यवहारात गुंतवणूक करण्यासाठी पैसे आहेत. पण थकबाकी देण्यास पैसे नसल्याचा आरोप केला होता. तर न्यायालयात अंबानी यांनी आपली बाजू मांडली होती. मोठे भाऊ मुकेश अंबानी यांच्या नेतृत्वाखालील जिओबरोबरील व्यवहार अयशस्वी ठरल्यानंतर त्यांची कंपनी दिवाळखोर घोषित करण्यासाठी कार्यवाही सुरु केल्याचे म्हटले होते.

Leave a Comment