ही आहे जगातील सर्वात तरूण महाराणी


सध्या भारतीय सोशल मीडियावर जेटसन पेमा वांगचुक या भूतानच्या महाराणी चांगल्याच चर्चेत आल्या आहेत. त्या जगातील सर्वात तरूण महाराणी म्हणून ओळखल्या जातात. भूतानचे राजे जिग्मे खेसर नामग्याल वांगचुक यांच्याशी एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या जेत्सुन पेमा वांगचुक यांचा विवाह झाला. त्या वयाच्या २१ व्या वर्षी सिंहासनावर विराजमान झाल्या.

१० वर्षांचे अंतर जेत्सुन आणि राजा वांगचुक यांच्यात आहे. २०११ मध्ये जेत्सुन या विवाहबद्ध झाल्या. त्यांनी लंडनमधील कॉलेजमधून आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. उच्च शिक्षणासाठी लंडनला जाण्याआधी त्या भारतात शिकल्या होत्या. जेत्सुन यांचे वडील वैमानिक असून त्या पश्चिम बंगालमधल्या सेंट जोसेफ कॉन्वेंट शाळेत एक वर्ष शिकल्या.

हिमाचलमधील एका कॉलेजमध्ये त्यांनी २००६ मध्ये बारावीपर्यंत शिक्षण घेतले आणि त्या त्यानंतर लंडनला निघून गेल्या. त्यांचे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यासोबत लग्नाची भूतानच्या राजाने घोषणा केली. इंग्रजी आणि हिंदी या दोन भाषा जेत्सुन पेमा वांगचुक यांना चांगल्याप्रकारे अवगत आहेत.

इन्स्टाग्रामवरही त्या सक्रीय आहेत. जेत्सुन यांचे जवळपास ७० हजार फॉलोअर्स इन्स्टाग्रामवर आहेत. त्यांचे शिक्षण जारी लंडनमध्ये झाले असले तरी त्या नेहमीच पारंपारिक भूतानी पेहरावातच असतात. अगदी त्या भारत दौऱ्याच्यावेळीही पारंपारिक वेशातच आल्या होत्या.

Leave a Comment