घरकाम सुटल्यामुळे महिलांत लठ्ठपणा

आधुनिक काळातील महिलांमध्ये एका बाजूला कुपोषण आहे तर दुसर्‍या बाजूला बहुपोषण आहे. म्हणजे काही महिला खायला सकस काही मिळत नसल्यामुळे आजारी आहेत तर काही उच्चभ्रू महिला ज्यादा खाण्यामुळे आजारी आहेत, लठ्ठ होत आहेत. महिलांच्या लठ्ठपणाच्या कारणांमागे सगळ्यांत महत्त्वाचे कारण म्हणजे त्यांचे घरकाम कमी झाले आहे. अमेरिकेतल्या युनिर्व्हसिटी ऑङ्ग साऊथ कॅरोलिना या विद्यापीठाने १९६० पासून महिलांच्या घरकामात झालेल्या बदलांचा सातत्याने वेध घेतला असून या ५०-५५ वर्षात महिलांचे घरकाम किती कमी झाले आहे आणि त्याचा त्यांच्या जाडीवर कसा परिणाम झाला आहे. हे पडताळून पाहिले आहे.

महिलांमध्ये शिक्षणाचे प्रमाण वाढले. त्या नोकर्‍या करायला लागल्या आणि खुर्चित बसून ऑङ्गिसचे काम करायला लागले. त्याचे परिणाम त्यांच्या शरीरावर झाले आहेत. हे दाखवताना त्यांनी महिलांचे घरकाम किती कमी झाले आहे हे नेमकेपणाने दाखविले आहे. १९६५ साली अमेरिकेतल्या महिला स्वयंपाक, घराची स्वच्छता, भांडी घासणे आणि धुणी धुणे यामध्ये आठवड्याला २६ तास खर्च करत असत. पण आता मात्र यातली बरीच कामे यंत्रावर सोपविली गेली आहेत आणि स्वयंपाकाचे काम बाजारातल्या तयार अन्नपदार्थांवर सोपविले गेले आहे. त्यामुळे २६ तासांची ही सरासरी ही १३ तासांवर आलेली आहे.

महिला ऑङ्गिसमध्ये बैठे काम जास्त करत आहेत आणि घरात मात्र कमी काम करत आहेत. १९६० साली जॉन्स हापकिन्स या संस्थेने केलेल्या एका पाहणीमध्ये अमेरिकेतल्या १३ टक्के महिला जाड होत्या. म्हणजे ज्या बॉडी मास इंडेक्सच्या पुढे त्यांना लठ्ठ म्हटले जाईल त्या इंडेक्सच्या पुढे १३ टक्के महिला होत्या. २००४ साली अशाच प्रकारची पाहणी करण्यात आली. तिच्यात मात्र ३२ टक्के महिला ही मर्यादा ओलांडून पुढे गेल्याचे आढळले.

४५ वर्षाच्या आयुष्यामध्ये किती महिला घरकामाचे व्यवस्थापन करण्यासाठी वेळ घालवतात याचेही प्रमाण मोजले गेले. १९६० साली नोकरी न करणार्‍या गृहिणी दर आठवड्याला ३३ तास कुटुंबाच्या व्यवस्थापनाला देत असत. तर २०१० साली हे प्रमाण १६ तासांवर खाली उतरले. नोकरी करणार्‍या महिला तर आठवड्यातून केवळ १० तास आपल्या कुटुंबाला देतात असे दिसून आले आहे.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment