निवडणुकी दरम्यान होणाऱ्या देवाणघेवाणीला आळा घालण्यासाठी आयकर विभाग सक्रिय

election
नवी दिल्ली – आयकर विभाग निवडणुकी दरम्यान होणाऱ्या अवैध पैशांच्या वापराला आळा घालण्यासाठी सक्रिय झाला असून आयकर विभागाने त्याकरिता विशेष पथकाची स्थापना केली आहे. त्याचबरोबर त्यांनी एक कंट्रोल रुमही तयार केला असून हे कंट्रोल रुम निवडणूक प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत २४ तास खूले राहणार आहे. पक्षांकडून होणाऱ्या पैशाच्या दुरुपयोगाची माहिती सामान्य जनता या विभागाला देऊ शकणार आहेत. एक टोल फ्री नंबरही त्यासाठी प्रसिद्ध करण्यात आला आहे.

त्यानुसार कोणतीही व्यक्ती आता स्वतःसोबत ५० हजार रुपयांची नगद बाळगू शकणार नाही. विभागाच्या हाती असा व्यक्ती लागला तर त्याच्यावर कठोर कारवाई केली जाणार आहे. पैसे बाळगण्यासंबंधात त्याची कसून चौकशीही केली जाणार आहे. त्याच्याकडून संतोषजनक उत्तर न मिळाल्यास त्याचे पैसे जप्त करून विभागीय कारवाई करण्यात येईल. तर, पोलिसांना सूचित करून त्याला तुरुंगात डांबण्यात येणार आहे.

आयकर विभागाने मतदारांमध्ये पैसे वाटप थांबवण्यासाठी इलेक्शन एक्सपेंडिचर मॉनिटरिंग सेलची (ईएएमएस) स्थापना केली आहे. देशभरातील बँकाना या सेलने एक निर्देश दिला आहे. त्यानुसार एखाद्या बँकेच्या खात्यातून १० लाखांपेक्षा जास्त रक्कम काढली किंवा टाकली तर आली तर त्या खातेधारकाची कसून चौकशी होणार आहे. तो या चौकशीत दोषी आढळल्यास त्यावर विशेष कारवाई केली जाणार आहे.

मागच्या वर्षी प्रमाणेच यावर्षीही आयकर विभागाने निवडणूकीमध्ये पैशांचा दुरुपयोग थांबवण्यासाठी टोल फ्री नंबर जाहीर केले आहेत. त्यानूसार मुंबईसह महाराष्ट्रामध्ये १८००२२१५१० या नंबरवर आपली तक्रार नोंदवता येणार आहे. देशामधील प्रत्येक राज्यांचे आयकर कार्यालये केंद्रीय आयकर विभागाच्या संपर्कात असल्यामुळे पैशांचा अवैध वापर निवडणुकांसाठी होत असल्याचे लक्षात येताच आयकर विभाग छापा मारून त्यांच्यावर कारवाई करेल.

Leave a Comment