यंदाची लोकसभा निवडणूक ही देशातील शेवटची निवडणूक – साक्षी महाराज

sakshi-maharaj
उन्नाव : मागच्या लोकसभा निवडणुकीत मोदी लाट आलो होती, पण ती लाट आता यावेळी त्सुनामी झाली असल्यामुळे यंदाची निवडणूक ही देशातील शेवटची लोकसभा निवडणूक असून त्यानंतर देशात कोणतीही लोकसभा निवडणूक होणार नसल्याची भविष्यवाणी भाजप खासदार साक्षी महाराज यांनी केली आहे.

साक्षी महाराजांनी उत्तर प्रदेशातील उन्नाव येथे बोलताना मोदींची स्तुती करताना देशातील ही शेवटची लोकसभा निवडणूक असेल. यानंतर लोकसभा निवडणूक होणार नाही आणि त्यापूढे त्याची गरजच नसणार आहे. मोदी लाट याला जबाबदार आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी सतत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांनी चर्चेत राहणाऱ्या साक्षी महाराजांनी हे वक्तव्य केले आहे.

साक्षी महाराज म्हणाले, की आता यापुढे मोदी त्सुनामीला जगातील कोणतीच ताकद रोखू शकत नाही. मी एक संन्यासी असून, जे माझ्या डोक्यात येते ते मी बोलत असतो. यंदा होणारी ही एकमेव निवडणूक आहे की जी देशाच्या नावावर लढली जाणार आहे. देशात सध्या जागृती निर्माण झालेली आहे. देशात चर्चा आहे, की मोदींमुळेच हा देश असल्यामुळे ही निवडणूक एका पक्षाची नाही.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी साक्षी महाराजांच्या वक्तव्यानंतर ट्विट करत म्हटले आहे, की भाजपने आपले म्हणणे स्पष्ट केले आहे. मोदी आणि शहा ही जोडी पुन्हा निवडून आली तर ते संविधान बदलतील आणि निवडणुका बंद होतील. असेच हिटलरने देखील केले होते.

Leave a Comment