असे बंद करा फेसबुकवरील ऑटो प्ले व्हिडीओ फिचर

facebook
अनेक चांगल्या आणि उत्सुकता वाढवणाऱ्या गोष्टी सोशल नेटवर्किंग साइटमध्ये अग्रेसर असलेल्या फेसबुकवर पहायला मिळतात. आपल्याला यामध्ये काही फीचर्स आहेत ती आणखी सहजपणे वापरायला मदत करतात. पण फेसबुकमध्ये असलेले ऑटोप्ले व्हिडीओ हे फीचर त्रासदायक ठरत असून एक व्हिडीओ पाहिल्यानंतर लगेच दुसरे व्हिडीओ दिसू लागतात. आपोआप ते व्हिडीओ प्ले झाल्याने इंटरनेट डेटाही संपतो. यापासून सुटका होण्यासाठी फेसबुकवर सेटिंग करावे लागते.

डेस्कटॉपवरील ऑटो प्ले व्हिडीओ ऑफ करण्यासाठी सर्वात आधी फेसबुक लॉगइन करा. त्यानंतर सेटिंगमध्ये व्हिडीओ मेन्यूवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला Auto-Play Videos असा पर्याय दिसेल. यात डिफॉल्टच्या जागी NO पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर व्हिडीओ आपोआप प्ले होणे बंद होईल.

फेसबुक अॅप अॅंड्रॉइड आणि आयफोनवर ओपन केल्यानंतर मेन्यू पर्यायावर क्लिक करा. प्रायव्हसीवर क्लिक करुन सेटिंगमध्ये मीडिया आणि कॉन्टॅक्ट पर्याय निवडा. त्यात व्हिडीओ आणि फोटोज् या पर्यायावर क्लिक करुन ऑटोप्ले हा पर्यांय निवडल्यावर ऑन मोबाईल डेटा आणि वायफाय कनेक्शन, ऑन वायफाय कनेक्शन ओन्ली आणि नेव्हर ऑटोप्ले व्हिडीओज् असे तीन पर्याय दिसतील. यातील नेव्हर ऑटोप्ले व्हिडीओज् वर क्लिक करा.

Leave a Comment