दारु प्यायल्यानंतर का ‘डूलु’ लागतो तळीराम

srunker
आपण अनेकदा पाहिले असे की ज्यांनी दारु प्यायलेली असते ती व्यक्ती आपल्या मनाला येईल ते बरळत असतो. त्याला कसलेच भान नसते. त्यात त्याला धड उभेही राहता येत नाही. पण असे का होते याची माहिती आज आम्ही तुम्हाला देणार आहोत.
srunker1
मेंदूतील प्रीफ्रंटल कोर्टेक्सवरच अल्कोहोल परिणाम करतो. प्रीफ्रंटल कोर्टेक्समुळेच आपण आपल्या भावना व्यक्त करु शकतो. आपण विचार करु शकतो, रागवू शकतो, हसू शकतो आणि बरच काही करु शकतो. दारु पिणाऱ्या व्यक्तीचा मेंदुतील हा 2 ग्लास प्यायल्यानंतर काम करणे सोडून देतो. मग त्यामुळे ती व्यक्ती चीड चीड करु लागतो, बरळू लागतो त्याचबरोबर धडपडू लागतो. दारूची मात्रा चढली की त्यांचा मेंदू सुस्तावतो.
srunker2
स्मरणशक्ती कमजोर होण्यामागेही अल्कोहोल असतो. तुमच्या पैकी कोणी जर दररोज दारु पित असेल एक लक्षात ठेवा तुमची स्मरणशक्ती लवकर कमजोर होऊन जाईल त्यामुळे वेळीच सावध व्हा. दारूच्या सेवनाने फक्त मेंदूवरच नाही तर आपल्या शरीरावरही त्याचे दुष्परिणाम होत असतो. दारुमुळे आपला रक्तदाब देखील आपल्या नियंत्रणात रहात नाही. दारू प्यायल्याने घशाचा आणि लिव्हरचा कर्करोग होण्याची शक्यता दुपट्टीने वाढते. दारू प्यायल्याने मेंदूतील अनेक भागांवर विपरीत परिणाम होतो. ते वाढत्या वयात जास्त जाणवते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही

Leave a Comment