म्हणून पंतप्रधान मोदी उलट बाजूने बांधतात घड्याळ

ghadyal
निवडणुकांचे बिगुल जोरात वाजू लागले असताना प्रमुख नेत्यांच्या स्टाईल, त्यांच्या सवयी अधिक ठळकपणे लोकांना दिसू लागतात. पंतप्रधान मोदी यांचा ड्रेसिंग सेन्स, लग्झरी ब्रांडच्या वस्तूंचा वापर, सेल्फी प्रेम अश्या अनेक सवयींची चर्चा सुरु झालीच आहे. नेहमी एक बाब नेहमी ठळकपणे नजरेत भरते ती त्यांची घड्याळ बांधायची स्टाईल. बहुतेक सर्व लोक घड्याळाची डायल मनगटाच्या बाहेरच्या बाजूला बांधतात पण मोदी बहुतेक वेळा घड्याळाची डायल मनगटाच्या आतल्या बाजूला येईल या पद्धतीने घड्याळ बांधतात.

या मागचे कारण केवळ स्टाईल हे नाही. त्यामागे मोदी यांच्या लकचा संबंध आहे असे सांगितले जाते. या पद्धतीने घड्याळ बांधणे मोदींसाठी लकी ठरते असे त्यांना वाटते त्यामुळे ते जाणूनबुजून या पद्धतीने घड्याळ बांधतात. जेव्हा पासून मोदी या पद्धतीने घड्याळ बांधू लागले तेव्हापासून त्यांचा राजकीय प्रवास आणि राजकीय करिअर वेगाने वर गेले असे भाजप मधील काही सदस्य सांगतात.

नरेंद्र मोदी जे पेन वापरतात ते माँट ब्लॉक या प्रसिद्ध कंपनीचे असून त्याची किंमत आहे १ लाख ३० हजार. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हेच घड्याळ वापरत असत. मात्र मोदी फोनसाठी सीम सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे वापरतात. त्यांच्या फोन मध्ये व्होडाफोनचे सीम आहे अशी चर्चा आहे.

Leave a Comment