मुंबई बाजार निवडणूक प्रचारसाहित्यांनी सजले

mukhavate
निवडणुकाच्या प्रचाराची धामधूम आता उमेदवार जाहीर झाल्यानंतर सुरु होईल. निवडणुका प्रचार साहित्याचा व्यापार करणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी दिवाळी ठरतात. मुंबईतले बाजार या प्रचार साहित्यांनी गजबजले असून तेथे कोणत्या पक्षाच्या प्रचार साहित्याला अधिक मागणी आहे त्यावरून कोणता पक्ष प्रचारात आघाडीवर आहे याचे अंदाज बांधणे सुरु झाले आहे.

maskss
या बाजाराचा सध्याचा कल पाहता मोदी यांच्या प्रतिमा असलेल्या उश्या, टोप्या, मुखवटे, टीशर्टना मोठी मागणी असून त्याखालोखाल शिवसेनेचे संस्थापक हिंदू हृद्य सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा असलेल्या वस्तूंना मागणी आहे. दुकानदारांच्या मते यंदाही मोदी करिश्मा कायम आहे.

प्रचार साहित्याची सर्वच राजकीय पक्षांकडून जोरदार खरेदी सुरु झाली असून पक्ष कार्यकर्ते घरोघरीच्या महिला मतदारांना खुश करण्यासठी पक्षाची निवडणूक चिन्हे असलेल्या पर्स, साड्या, टोप्या वाटप करू लागले आहेत. नेत्यांच्या मास्कच्या किमती ३ रुपयांपासून १० रुपयांपर्यत आहेत. टोप्या ६ रुपयापासून तर टी शर्ट १०० रुपयांपासून मिळत आहेत. निवडणुकीच्या काळात या बाजारात कोट्यावधी रुपयांची उलाढाल होते असे समजते.

Leave a Comment