मतदान शाईच्या विक्रीतून ३३ कोटींचा महसूल

shai
निवडणुकीत मतदान केल्यावर मतदाराच्या बोटाला लावली जाणारी शाई बनविण्याचा परवाना असलेल्या मैसूर पेंट्स अँड वॉर्निश लिमी. या सरकारी कंपनीला यंदाच्या निवडणुकीत ३३ कोटी रुपये केवळ महसुलातून मिळणार आहेत. यंदा या कंपनीकडे २६ लाख फॉलोअर्स ऑर्डर आल्या असून २०१४ च्या निवडणुकीच्या तुलनेत त्या ४.५ लाखांनी अधिक आहेत.

१९३७ साली स्थानिक रोजगार मिळावा म्हणून मैसूरचे राजे वाडियार यांनी १९३२ मध्ये ही कंपनी स्थापन केली होती आणि नंतर ती कर्नाटक सरकारने घेतली. १९६२ पासून या कारखान्यात बनविली गेलेली विशेष शाई मतदान प्रक्रियेत वापरली जात आहे. केवळ भारतातच नाही तर जगातील ३० पेक्षा अधिक देशाना ही शाई निर्यात केली जाते असेही कारखाना व्यवस्थापक सांगतात.

Leave a Comment