एसबीआयची खास सुविधा,कार्ड शिवाय एटीएम मधून काढा पैसे

yono
देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या एसबीआयने बँकेच्या ग्राहकांना खास सुविधा उपलब्ध करून दिली असून या बँकेचे ग्राहक एटीएम कार्डशिवाय एटीएम मधून पैसे काढू शकणार आहेत. शुक्रवारी या संदर्भातील अधिकृत घोषणा केली गेली आहे. या योजनेला योनो कॅश असे नाव दिले गेले असून हि सुविधा देशातील बँकेच्या १६५०० एटीएम केंद्रांवर सुरु झाली आहे.

या साठी ग्राहकाला योनो अॅप डाऊनलोड करून घ्यावे लागणार आहे. त्यानंतर या माध्यमातून कार्ड लेस कॅश ग्राहक एटीएम मधून काढू शकेल. या एटीएमना योनो कॅश पॉइंट असे नाव दिले गेले आहे. या प्रकारची सुविधा देणारी एसबीआय भारतातील पहिली एकीकृत बँक आहे. योनो कॅश फिचर ग्राहकासाठी जादा सुरक्षित आणि जादा सुविधाजनक आहे.

sbi
यात दोन प्रकार आहेत. एकतर हे अॅप फोनमध्ये असेल त्यावर ६ आकडी योनो कॅश पिन सेट करायचा आहे. कॅश काढतेवेळी ग्राहकाच्या रजिस्टर्ड फोनवर ६ आकडी कोड मेसेज येणार आहे आणि त्यानंतर ३० मिनिटांच्या कालावधीत ग्राहक कोणत्याची योनो कॅश पॉइंट वरून पैसे काढू शकणार आहे. अँड्राईड तसेच आयओएस फोनवर हि सुविधा वापरता येणार आहे.

Leave a Comment