या जत्रेत विडा जमवितो लग्ने

paan
घरातली मुले मुली मोठ्या होऊ लागल्या कि त्यांच्या विवाहाची चर्चा घरातील मोठी मंडळी सुरु करतात. त्यांना चांगला जीवनसाठी मिळावा आणि त्यांचे वैवाहिक आयुष्य सुखाचे जावे अशी सर्व वडीलधारयांची इच्छा असते. मग ही घरे श्रीमंतांची असतो, मध्यमवर्गीयांची असोत, गरिबांची असोत किंवा जंगल पाड्यातून राहणाऱ्या आदिवासींची असोत.

haat
मध्यप्रदेश आणि गुजरातच्या जवळ असलेल्या भगोरिया येथे एका अनोख्या जत्रेची सुरवात १४ मार्च पासून झाली असून दरवर्षी ही जत्रा होळीपूर्वी सात दिवस सुरु होते. या जत्रेत खायच्या विड्याचे पान लग्ने जमाविते असे सांगितले तर कुणी विश्वास ठेवणार नाही. या जत्रेत प्रामुख्याने भिल समाजाचे लोक येतात. अन्य अनेक जात्रांप्रमाणे येथेही रंग, संगीत, खाणे पिण्याचा जल्लोष असतो. तसेच येथे अशी प्रथा आहे कि एखाद्या मुलाला कुणी मुलगी आवडली तर तो तिला पान देतो आणि तिने पान घेतले तर मुलगा मुलीला आवडला आहे हे लक्षात घेऊन त्याचा विवाह केला जातो.

bhagodia
हा प्रकार म्हणजे एकप्रकारचा ट्रायबल व्हेलेन्टाइन सोहळाचा असतो. अनेकदा अश्या प्रकाराने लग्न ठरविलेली जोडपी पळून जातात. त्यांना परत आणून त्यांचा विवाह लावला जातो. भगोरिया या नावामागे त्यातील भागो हे पळा यासाठीच आहे असे सांगितले जाते. अनेकदा मुलगा त्याला पसंत पडलेल्या मुलीच्या अंगावर गुलाल टाकतो आणि तोच गुलाल मुलीने त्या मुलाच्या अंगावर टाकला तरी पसंती झाली असे समजून शुभमंगल साजरे होते.

सायंकाळच्या वेळी या जत्रेला विशेष रंग चढतो. विविध वाद्ये, लोकगीते, नृत्य यांनी वातावरण भारून जाते त्याचबरोबर खाण्यापिण्याच्या विविध पदार्थांच्या वासाचा दरवळ ते अधिक सुगंधी करतो. अश्या उत्साही वातावरणात जीवनसाथी निवडला जात असेत तर ते विवाह नक्कीच यशस्वी होत असतील असे मानायला हरकत नसावी.