अशी घ्या त्वचेची काळजी

skin3

माणसाच्या व्यक्तिमत्त्वाची परीक्षा करणार्‍या ज्या अनेक बाबी आहेत, त्यात त्वचेचाही समावेश होतो. म्हणजे एखाद्या माणसाची उंची, जाडी, ही जशी त्याची ओळख असते, तशीच त्वचा हीही माणसाच्या व्यक्तिमत्त्वाचा भाग असते. म्हणजे एखाद्या मुलीची सतेज त्वचा चटकन लोकांचे लक्ष आकर्षून घेण्यास कारण ठरते व हेच त्वचेवर कही डाग असतील, कांही त्वचारोग असेल तरीही लोकांचे लक्ष वेधले जातेच. या त्वचेची काळजी घेणे सर्वच वयोगटातील लोकांसाठी उपयुक्त ठरत असते. जाहिरातींतूनही मुख्यत्त्वे गोरेपण देणार्‍या क्रिमच्या जाहिराती सर्वाधिक प्रमाणात येतात ते त्यामुळेच. त्वचेची निगा राखण्याचे तसेच काही व्याधी असल्यास त्या दूर करण्याचे हे कांही सोपे उपाय-
skin
१)अंगाला कंड सुटणे –  हा गंभीर रोग नसला तरी चार लोकांत अंग खाजविणे हे कांही चांगले लक्षण नसते. काही विशिष्ट रोगांमुळे अथवा अथवा अन्य विशिष्ट कारणाने अंगाला खाज असेल तर कोथिबीरीचा रस अंगाला चोळून अर्ध्या तासाने आंघोळ केल्यास कंड कमी होते.

२) त्वचा सतेज राहण्यासाठी- साबणाच्या वापराऐवजी हिरवे मूग सालासकट बारीक दळून आणावेत व हे पीठ दुधात अथवा पाण्यात कालवून आंघोळीच्या वेळी अंगाला लावावे.  बाराही महिने हे वापरता येते. हिरवे मूग हे उत्तम त्वचा राखणारे किवा स्कीन टोनर आहेत.

३) चेहर्‍याची त्वचा  उजळणे- जायफळ दुधात उगाळून तो लेप दिवसाआड चेहर्‍यावर लावावा. वाळल्यावर चेहरा धुवावा. आठ दिवसात त्वचा उजळल्याचे दिसेल.

४) मुरमे, पुटकुळ्या, काळे डाग – यावरही दिवसाआड जायफळ दुधात उगाळून त्याचा पातळ लेप चेहर्‍यावर लावावा वाळल्यावर चेहरा धुवावा.

५) तेलकट त्वचा- बर्‍याच जणांना वारंवार चेहरा धुवूनही त्वचेत तेलकटपणा जास्त असल्याने चेहरा तेलकट दिसण्याचा त्रास जाणवतो, अशा वेळी नागरमोथा पावडर पाण्यात कालवून आंघोळीच्या आधी सर्व अंगाला लावावी व अर्ध्या तासाने आंघोळ करावी. केवळ चेहर्‍यावरही हा लेप लावता येईल. हा उपचार आठवडयातून दोनच वेळा करावा.

६) कोरडी त्वचा – तेलगट त्वचेविरूद्द म्हणजेच कोरडी त्वचा असण्याचा त्रासही बर्‍याच जणांना जाणवतो. कोरडी त्वचा निस्तेज दिसते. यावर उपाय म्हणून आठवडयातून दोन वेळा खोबरेल तेल व साजूक तूप एकत्र करून अंगाला चोळून लावणे उपयुक्त ठरते. खोबरेल तेल व साजूक तूपाचे हे मिश्रण नैसर्गिक मॉइश्चरायझरचे काम करते. या मिश्रणाने त्वचेवर जे आवरण तयार होते, त्यामुळे त्वचेखालील आर्द्रता आपोआप राखली जाते आणि त्वचेचा कोरडेपणा कमी होतो.
skin1
त्वचेला तेल लावणे हा खरोखरच त्वचेचे अनेक रोग होण्यापासून संरक्षण देणारा सोपा उपाय आहे. मात्र आजकाल अंगाला तेल लावून अंघोळ करण्याइतका वेळ हाताशी नसतो. अशा वेळी रोज एकाच अवयवाला तेल लावून अंघोळ करता आली तरी हे संरक्षण मिळविता येते. त्वचा तेल शोषून घेते हे आता विज्ञानाने सिद्ध झाले आहे. हे शोषलेले तेल अंगात मुरल्याने सर्व त्वचेला त्याचा उपयोग होत असतो. तसेच वारंवार साबण बदलणे हेही घातक असते. साबणाची निवड करताना तो तेलापासून बनविलेला असेल तर अधिक उपयुक्त असतो हे लक्षात ठेवावे. दिवसातून दोन ते तीन वेळा नुसत्या पाण्याने तोंड, हात पाय धुतले गेले तरी त्वचा चांगली राहते.

Disclaimer: आरोग्य विषयक लेखात दिली गेलेली माहिती प्राथमिक स्वरुपाची आहे. हि माहिती वैद्यकीय सल्ल्याचा पर्याय होऊ शकत नाही  या माहितीचा उपयोग करण्यापूर्वी आपण डॉक्टर अथवा वैद्यकीय तज्ञाकडून खात्री करून घ्यावी. या माहितीची जवाबदारी माझा पेपर घेत नाही