पवारच भाजपमध्ये आल्यास निघुन जाईल निवडणुकींची रंगत – उद्धव ठाकरे

uddhav-thakre
मुंबई – युती झाल्यानंतर पहिल्यांदाचा अमरावतीत शिवसेना-भाजप युतीचा महामेळावा पार पडला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे यांनी आजकाल कोणावर टीका करायची म्हणजे भीती वाटते कारण तो उद्या भाजप किंवा शिवसेनेत असायचा असे म्हटले आहे. याच दरम्यान उद्धव यांनी यावेळी शरद पवारांना तेवढे भाजपत घेऊ नका असे म्हणत, मुख्यमंत्र्यांना चिमटा काढला.

उद्धव ठाकरेंनी यावेळी युतीवर भाष्य केले. वाद असले तरी कधीही आपला संघर्ष कधीही राज्याच्या हिताआड येऊ दिले नसल्याचे सांगताना नरेंद्र मोदींचेही उद्धव ठाकरेंनी कौतुक केले. मी त्यांना अजूनही नरेंद्रभाई असे म्हणतो. देशाच्या पंतप्रधानपदी आपला भाऊ वाटावा अशी व्यक्ती असल्याचा अभिमान असल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले आहे.

दोन्ही पक्षांकडून काही दिवसांपूर्वी उघड तलवारी काढल्या होत्या, ज्या काही गोष्टी झाल्या त्या आता सगळ्या विसरा आणि खऱ्या तलवारी काढून आता मैदानात उतरा असे आवाहन यावेळी उद्धव ठाकरेंनी केले. मनातून आणि म्यानातून मुख्यमंत्र्यांनी तलवारी काढल्या असल्याचेही यावेळी ठाकरे म्हणाले. जनतेची शेवटची अपेक्षा शिवसेना भाजप असून आम्ही गेलो तर अंधार पसरेल असे सांगत दुसरा कोणताही पक्ष सर्वसमान्यांना आधार देणारा नसल्याचे उद्धव ठाकरेंनी म्हटले.

Leave a Comment