भाजप विरोधात ममता बॅनर्जी यांचा ‘विशेष उमेदवार’

mamta-banerjee
कोलकाता – अवघ्या काही दिवसात लोकसभा निवडणुकींना सुरुवात होणार असुन त्यासाठी प्रत्येक राजकीय पक्षांनी जय्यत तयारी सुरु केली आहेत. त्यातच पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी देखील लोकसभा निवडणुकांसाठी मोठी तयारी केलेली आहे. त्यांनी या निवडणुकीत भाजप विरोधात विशेष उमेदवार रिंगणात उतरवले आहेत. त्यांनी यावेळी लोकसभा निवडणुकीसाठी जवळपास 41 टक्के महिलांना उमेदवारी दिली आहे. ज्यामुळे तृणमुल काँग्रेसच्या तिकीटावर सर्वाधिक महिला निवडणूक लढवणार आहेत.

पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात ममता बॅनर्जी यांनी महिलांना उमेदवारी दिली आहे. टॉलीवूडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्री नुसरत जहां यांचाही यामध्ये समावेश आहे. नुसरत जहां यांना दिलेल्या उमेदवारीनंतर याची चर्चा सर्वत्र होत आहे. नुसरत जहां तृणमूल काँग्रेसच्या तिकीटीवर बसीरहाट या लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवतील.
nusrat-jahan
भाजपचे या मतदार संघात वर्चस्व आहे. पण, येथील चित्र नुसरत जहांमुळे पालटण्याची शक्यता आहे. आत्तापर्यंत अनेक चित्रपटांमध्ये नुसरत जहांनी काम केले आहे. त्यापैकी दुर्गा माई, हर हर ब्योमकेश, जमाई ४२० सारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये ही त्यांनी अभिनयाची जादू दाखवली आहे.

पण, नुसरत जहां यांची कारकिर्द काहीशी विवादास्पदही राहिलेली आहे. पहिल्यांदा त्यांचे नाव पार्क स्ट्रीट बलात्कार प्रकरणात चर्चेत आले होते. तर या प्रकरणाचा मुख्य आरोपी कादर खान यांची त्या गर्लफ्रेंडही राहिल्या आहेत. बंगाल सरकारद्वारा आयोजित होणाऱ्या अनेक सांस्कृतिक आणि राजकीय कार्यक्रमांमध्ये भागही घेत आहेत. राजकारणात आपण येऊ असा विचारही केला नव्हता. माझ्या जबाबदाऱ्या उमेदवारी मिळाल्यानंतर वाढल्या असल्याचे त्यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले आहे.

Leave a Comment