दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर ‘गुगल’ची कुऱ्हाड

google
नवी दिल्ली – २३० कोटींपेक्षा जास्त दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना जाएंट सर्च इंजिन असलेल्या ‘गुगल’ ने आपल्या प्लॅटफॉर्मवरुन बॅन केले असल्याची माहिती गुरुवारी गुगलने दिली. यासंदर्भात गुगलने दिलेल्या माहितीनुसार या जाहिराती वापरकर्त्यांची दिशाभूल करत असल्यामुळे त्यावर बंदी घालण्यात आली आहे.

आपल्या नव्या जाहिरात धोरणांमध्ये 31 नव्या नियमांची भर गुगलने घातली आहे. त्यानुसार या जाहिराती त्यांच्या धोरणांच्या उल्लंघन करणाऱ्या ठरत आहेत. गुगलच्या बॅड अॅड रिपोर्टनुसार प्रतिदिवस ६ मिलियन म्हणजे ६० लाख दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींना बॅन करण्यात आले होते. ‘गुगल’ आपले प्लॅटफॉर्म अधिकाधिक सुरक्षित कसे बनवता येईल यासाठी प्रयत्नरत आहे.

कंपनीनुसार प्लॅटफॉर्मवरील या जाहिराती व्यापार, उत्पादन आणि सर्व्हिसच्या माध्यमातून युजर्सला जोडण्यासाठी आहे. युजर्सला दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींमुळे कटू अनुभवांना सामोरे जावे लागते. गुगलने पुढे सांगितले, की आमचा मुख्य हेतू बॅड अॅडला काढून युजर्स आणि बिजनेस पार्टनर्समध्ये योग्य तो समन्वय साधणे असून त्यांना चांगल्यारितीने जोडणे आहे. ज्यामुळे दोघांचाही अनुभव चांगला राहिल. याशिवाय गुगल ने जवळपास १ मिलियन म्हणजे १० लाखहून अधिक जाहिरातदारांचे अकाउंट्स बॅन केले आहेत.

Leave a Comment