‘या’ व्यक्तीसाठी आयफोन बनला तारणहार

iphone
1975 साली बॉलीवूडचे महानायक अर्थात अमिताभ बच्चन यांचा दिवार चित्रपट हा आपल्यापैकी जेवढ्या लोकांनी बघितला असेल त्यांना त्या चित्रपटातील 786 हा लकी बिल्ला नक्कीच आठवत असेल. ज्या बिल्ल्यामुळे चित्रपटात अनेकवेळा जीव वाचला जातो. पण ते झाले फिल्मी. आता या चित्रपटाला शोभेल अशी घटना ऑस्ट्रेलियाच्या न्यू साउथ वेल्सच्या निंबिन शहरात घडली आहे. पण तेथे 786चा बिल्ला नाहीतर चक्क आयफोनने त्या व्यक्तीचा जीव वाचवला आहे.


या घटनेबाबत पोलीसांनी दिलेल्या वृत्तानुसार न्यू साउथ वेल्सच्या निंबिन शहरात १३ मार्च रोजी सकाळी ४३ वर्षीय व्यक्तीवर एका अज्ञात व्यक्तीने धुनष्य बाणाने हल्ला करण्यात आला. पण या हल्ल्यात त्या व्यक्तीचे प्राण त्याच्या मोबाईलमुळे वाचला. निंबिन शहराच्या रस्त्यावर कार पार्क करून ही व्यक्ती त्याच्या घरात जात होता. तेवढ्यात तिथे त्याने एक व्यक्ती धनुष्यबाणसह उभा असलेला पाहिल्यानंतर त्या हल्लेखोर व्यक्तीचे मोबाइलवर फोटो काढण्याचा प्रयत्न पीडित व्यक्तीने केला. तेव्हा त्या व्यक्तीने अचानक धनुष्यबाणाने हल्ला केला.

हा हल्ला फारच घातक होता. त्या व्यक्तीच्या मोबाइलला भेदून बाण त्याच्या हनुवटीपर्यंत पोहोचल्यामुळे ती व्यक्ती किरकोळ जखमी झाली. त्यांना रूग्णालयाने उपचारानंतर सुट्टी दिली आहे. तसेच ३९ वर्षीय हल्लेखोराला अटक केली असल्याचे एनएसडब्ल्यू पोलिसांनी सांगितले.

Leave a Comment