भारतात राहण्यासाठी हैद्राबाद आणि पुणे बेस्ट शहरे

hydrabad
दरवषी प्रमाणे यंदाही जगातील कोणती शहरे वास्तव्यासाठी बेस्ट आहेत त्याची यादी मर्सरने क्वालिटी ऑफ लिविंग रँकिंग खाली सादर केली असून भारतातील ७ शहरे त्यात सामील आहेत. या यादीत राहण्यासाठी सर्वोत्तम शहरे बनण्याचा मान गतवर्षी प्रमाणेच यंदाही हैद्राबाद आणि पुणे या शहरांनी मिळविला आहे. हैद्राबाद भारतात १ नंबर तर पुणे दोन नंबरवर आहे. यंदा या यादीत प्रथमच वैयक्तिक सुरक्षा या कॅटेगरीचा समावेश केला गेला असून त्यात भारतातील चेन्नई १ नंबरवर आहे.

गेल्या वेळी या यादीत हैद्राबाद आणि पुणे जागतिक यादीत संयुक्तपणे १४२ व्या नंबरवर होते यंदा हा नंबर १४३ वर गेला आहे. या यादीसाठी जगातील २३१ शहरांचा विचार केला गेला. त्यात सलग १० वर्षे ऑस्ट्रियातील विएन्ना हे शहर पहिल्या क्रमांकावर आहे.

ही यादी तयार करताना व्यापार सुलभता, उच्च गुणवत्ता असलेल्या पायाभूत सुविधा, रस्ते, वीज, वाहतूक, शिक्षण सुविधा, मेट्रो- रेल्वे, चिकित्सा सुविधा अश्या अनेक बाबी विचारात घेतल्या जातात. यंदा २१ व्या वेळी अशी यादी जाहीर केली गेली आहे.

Leave a Comment