बॉम्ब वादळाचा ८ कोटी नागरिकांना फटका

colorado
बुधवारी अमेरिकेतील कोलोराडो परिसरात सायक्लोन बॉम्ब ने हाहाक्कार माजविला असून या हिम्वादालाचा दणका ८ कोटी नागरिकांना बसला आहे. जेव्हा हवेचा दाब सतत कमी होत राहतो त्यावेळी निर्माण होणारया वादळांना सायक्लोन बॉम्ब असे म्हटले जाते. सर्वसामान्य वादळापेक्षा हे फारच भीषण वादळ मानले जाते. कोलोराडो मध्ये हे वादळ सूरु झाल्यानंतर बचाव कार्यासाठी आलेल्या मदत दलांनाच गाड्या सोडून सुरक्षित जागी आश्रय घेण्याची वेळ आली असल्याचे समजते.

tufan
वेलिंग्टन भागात या वादळामुळे १०० पेक्षा अधिक वाहने एकमेकांवर आदळून अपघातग्रस्त झाली आहेत. त्यात काही नागरिक जखमी झाले आहेत. सोशल मिडियावरून हवामान विभाग नागरिकांनी घराबाहेर पडू नये, वाहने रस्त्यावर आणू नयेत अश्या सूचना देत आहे. केंत्रीय उत्तर मैदानी भागात मिडवेस्ट मध्ये गुरुवारी प्रचंड हिमपात झाला असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. लाखो घरांची वीज गुल झाली आहे तर विमानतळ बंद केले गेले आहेत. शाळा बंद आहेत. डेनेव्हर विमानतळावरून होणारी २ हजार विमान उड्डाणे रद्द केली गेली आहेत.

या वादळाचा प्रत्यक्ष उपद्रव ५ कोटी नागरिकांना होत आहे तर १ कोटी नागरिक हिमवादळात अडकले आहेत. १.७ कोटी नागरिकांना पुराचा धोका निर्माण झाला आहे असे आकडेवारी सांगते.

Leave a Comment