अॅवॉर्ड फंक्शनमध्ये आमीरच्या अनुपस्थिती मागे हे कारण ?

aamik
बॉलीवूडमध्ये परफेक्शनिस्ट म्हणून वेगळी ओळख निर्माण केलेला गुणी अभिनेता अमीर खान याने वयाची ५४ वर्षे पूर्ण केली आहेत. बॉलीवूड मध्ये अॅवॉर्ड फंक्शन हा मोठा आणि लोकप्रिय सोहळा असून त्यात बहुतेक सर्व सितारे हजेरी लावतात. येथेही आमीरने त्याचे वेगळेपण जपले असून १९९५ पासून त्याने एकही अॅवॉर्ड फंक्शनला हजेरी लावलेली नाही. त्यामुळे त्याला घमेंडी असल्याचे बोल ऐकावे लागले आहेत. मात्र अश्या कार्यक्रमाना हजर न राहण्यामागे वेगळेच कारण असल्याचे समजते.

१९९५ ला आमीरखान चा रंगीला चित्रपट आला आणि तो तुफान चालला. तसेच त्यातील आमीरच्या टपोरी भूमिकेचे खूप कौतुक झाले. तेव्हा फक्त फिल्मफेअर अॅवॉर्ड दिली जात होती. यंदाचे सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे अॅवॉर्ड आमीरला मिळणार याची खात्री अनेकांना होती. मात्र या कार्यक्रमात आमीरला परफॉर्मन्स द्यायचा होता आणि त्याबदली त्याला अॅवॉर्ड दिले जाणार होते. आमीरच्या सेक्रेटरीने ही बाब आमीरला सांगितली तेव्हा त्याने स्पष्ट केले कि बक्षीस माझे काम चांगले झाल्याबद्दल आहे. मी परफॉर्मन्स द्यायचा असेल तर त्यासाठी वेगळे पैसे आकारीन. अर्थात हे बाब मान्य झाली नाही आणि महिन्याभराने झालेल्या या सोहळ्यात शाहरुख खान याला दिलवाले दुल्हनियासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार जाहीर झाला. तेव्हापासून आमीर अॅवॉर्ड फंक्शन सोहळे टाळतोच.

अर्थात काही काळानंतर शाहरुखने त्याने त्याला मिळालेली ९० टक्के अॅवॉर्ड विकत घेतली असल्याचे वक्तव्य करून ही बक्षिसे कशी दिली जातात हे सूचित केले होते.

Leave a Comment