टशीगंग, जगातील सर्वाधिक उंचीवरचे मतदानकेंद्र

matadan
लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाचे वेळापत्रक निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. त्यात जगातील सर्वाधिक उंचीवरचे मतदान केंद्र हिमाचल मधील लाहोल स्पिती जिल्ह्यात टशीगंग हे ठरले आहे. चीन सीमेपासून १० किमीवर असलेले हे ठिकाण समुद्रसपाटीपासून १५२५६ फुट उंचावर आहे. यापूर्वी जगातील सर्वाधिक उंचीवरचे मतदान केंद्र याच भागातील हिक्कीम हे होते. तेथील पोलिंग बूथ १४५६७ फुट उंचावर आहे.

tashiganga
टशीगंग काजापासून साधारण ३५ किमीवर असून सध्या तेथे ३ ते ४ फुट बर्फ आहे. त्यामुळे पोलिंग बूथ कडे जाणारा रस्ता बंद आहे. मात्र प्रशासन रस्ता सुरु करण्यासाठी प्रयत्नशील आहे. येथील मतदारांना मतदानाची उत्सुकता असून ते पारंपारिक वेशात मतदानाला येतात. १५ हजार फुटापेक्षा उंच असल्याने येथे प्राणवायूचे प्रमाण कमी आहे त्यामुळे श्वसनाला त्रास होतो तसेच येथे झाडे उगवत नाहीत. या ठिकाणी मतदारांची संख्या ४९ असून त्यात २९ पुरुष आणि २० महिला मतदार आहेत.

येथील सर्वाधिक मोठ्या मतदाराचे वय ७८ असून सर्वात लहान मतदार १९ वर्षाचा तरुण आहे.

Leave a Comment