व्हॉट्सअ‍ॅपमध्ये सामील होणार गुगलचे हे खास फीचर !

whatsapp
नवी दिल्ली : जगभरातील तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपमध्ये आता नवीन फीचर जोडले जाणार आहे. व्हॉट्सअ‍ॅपचा वापर युजर्सना अधिक सजकतेने करता यावा. तसेच, गेल्या काही दिवसांपासून फेकन्यूजवर प्रतिबंध ठेवण्यासाठी जाहिरातींसोबतच व्हॉट्सअ‍ॅप आता फीचर्समध्येही काही बदल करत आहे. गुगलचे फेक न्यूजवर आळा घालण्यासाठी रिव्हर्स इमेज सर्च आहे, यानुसार फोटो खरे आहेत की मार्फ केले आहेत, याची माहिती कळणार आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, फेक न्यूज आणि फोटो व्हॉट्सअ‍ॅपवर शेअर करण्यात येत असल्यामुळे गुगल सारखेच व्हॉट्सअ‍ॅप सुद्धा करण्याच्या तयारीत आहे. म्हणूनच नवीन फीचरच्या माध्यमातून फेक माहिती आणि फोटोंवर आळा घालण्याचा प्रयत्न व्हॉट्सअॅप करणार आहे.

यासंदर्भात WABetainfo ने दिलेल्या माहितीनुसार, Search Image चा ऑप्शन अ‍ॅन्ड्रॉईडसाठी व्हॉट्सअ‍ॅप 2.19.73 अपडेटमध्ये दिसत आहे. कंपनीकडून यामध्ये गुगल API चा वापर करण्यात येईल अशी शक्यता आहे. कारण, रिव्हर्स सर्च केला जाऊ शकतो. जर असे झाले तर एखादा फोटो व्हॉट्सअ‍ॅपच्या माध्यमातून गुगलवर रिव्हर्स सर्च करुन त्यातून फोटोची माहिती घेण्यात येईल. दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅपमध्ये देण्यात आलेले रिव्हर्स सर्च फीचर कसे काम करणार आहे, त्याबद्दल अद्याप काहीही स्पष्ट करण्यात आले नाही. मात्र, असे समजते की, फेक फोटोंना काहीप्रमाणात लगाम लावला जाणार आहे.

त्याचबरोबर WABetainfo च्या माहितीनुसार, एक स्क्रीनशॉट शेअर करण्यात आला आहे. Search Image चा ऑप्शन यामध्ये दिसत आहे. हे सध्या बीटा व्हर्जनमध्ये आहे. आपल्याला व्हॉट्सअ‍ॅप बीटा वापरण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅप बीटा टेस्टिंग प्रोग्रॉमचा भाग बनवावा लागेल. दरम्यान, व्हॉट्सअ‍ॅपच्या फायलन बिल्डमध्ये हे फीचर कधी येणार आहे, याबाबत काहीही स्पष्ट करण्यात आले नाही.

व्हॉट्सअ‍ॅपशी संबंधित दुसऱ्या रिपोर्टनुसार, ग्रुप इनव्हिटेशन कंपनीने सिस्टम सुरु केली असून तुम्हाला यामध्ये परवानगीशिवाय कोणत्याही ग्रुपला जोडले जाऊ शकत नाही. व्हॉट्सअ‍ॅपच्या सेटिंग्जमध्ये जाऊन यासाठी इनव्हिटेशन ऑन्ली करु शकता. यामुळे कोणालाही व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर अ‍ॅड करायचे असेल, तर तुम्हाला इनव्हिटेशन येते.

Leave a Comment