निवड समिती करत आहे अजिंक्य रहाणेवर अन्याय – वेंगसरकर

ajinkya-rahane
मुंबई – सध्याच्या घडीला टीम इंडियाचा स्टार फलंदाज अंजिक्य रहाणे हा संघाबाहेर असून इतर खेळाडूंप्रमाणे त्याला संघात संधी देण्यात न आल्याने माजी क्रिकेटपटू दिलीप वेंगसरकर नाराज झाले असून निवड समितीकडून अजिंक्य रहाणेवर अन्याय होत असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.

२०१८च्या सुरुवातीला दक्षिण आफ्रिकेविरोधात अजिंक्य रहाणे शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता. अजिंक्यला त्यानंतर एकाही एकदिवसीय सामन्यात संधी देण्यात आलेली नाही. याबद्दल बोलताना वेंगसरकर म्हणाले, की इंग्लंडमध्ये अजिंक्यने स्वत:ला सिद्ध केले आहे. तो उत्तम क्षेत्ररक्षक असण्याबरोबरच तो चौथ्या क्रमांकावर चांगली फलंदाजी करु शकतो. त्याला निवड समितीने संधी देण्याऐवजी त्याच्यावर अन्याय करत असल्याचा आरोप वेंगसरकर यांनी केला आहे.

पुढे वेंगसरकर बोलताना म्हणाले, की संघात अजिंक्य सलामीला अथवा चौथ्या क्रमांकावर खेळू शकतो. रायुडू चौथ्या क्रमांकावर अपयशी ठरत आहे. चौथ्या क्रमांकाचा भारतीय संघातील तिडा अजूनही सुटला नाही. त्या जागी अजिंक्यचा विचार होणे गरजेचे असल्याचे वेंगसरकर म्हणाले.

Leave a Comment