बेनझीरच्या मुलाकडून इम्रान खानची पोलखोल

bilawal-bhutto
लाहोर-पाकिस्तान पीपल्स पार्टीचे (पीपीपी) अध्यक्ष आणि पाकिस्तान नॅशनल असेंब्लीचे सदस्य बिलावल भुट्टो जरदारी यांनी म्हटले आहे की पाकिस्तानात दहशतवादी संघटना खुलेपणाने काम करीत आहे. बिलावल हे पाकिस्तानच्या माजी पंतप्रधान बेनझीर भुट्टो आणि असिफ अली जरदारी यांचे पुत्र आहेत. पाकिस्तान सरकारवर हल्ला करताना, त्यांनी सांगितले की इतर देशांवर हल्ला करणारे दहशतवादी येथे मुक्तपणे का फिरत आहेत? सिंध विधानसभेत बुधवारी ते पत्रकारांशी बोलत होते.

त्यांनी सांगितले की पाकिस्तानमध्ये कार्यरत दहशतवादी संघटनांवर कारवाई न केल्यामुळे त्यांच्या पालकांना शिक्षा सहन करावी लागली. या दहशतवादी संघटना पाकिस्तानमध्ये मुलांना ठार मारतात आणि परदेशी धर्तीवर हल्ला करतात. त्याची शिक्षा आज संपूर्ण पाकिस्तान भोगत आहे.
अलीकडे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान म्हणाले होते की कोणत्याही दहशतवादी संघटनेला परदेशात हल्ले करण्यासाठी पाकिस्तानच्या भूमिचा वापर करण्याची परवानगी दिली जाणार नाही. त्यानंतर त्यांच्या सरकारने इस्लामिक दहशतवादी संघटनांच्या विरोधात कारवाईची घोषणा केली. बिलावल भुट्टो यांनी दावा केला आहे की पंतप्रधान इम्रान खान यांच्या तहरीक-ए-इंसाफ पार्टीत असे तीन मंत्री आहेत, ज्यांचा प्रतिबंधित संस्थांशी संबंध आहेत.

भारत आणि पाकिस्तान यांच्यात जम्मू-काश्मीरच्या पुलवामावर हल्ल्यानंतर तणावाचे संबंध आहेत. 14 फेब्रुवारीला झालेल्या आत्मघाती हल्ल्यात केंद्रीय राखील पोलिस दलाचे (सीआरपीएफ) 40 जवान ठार झाले होते. या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तान स्थित दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने घेतली होती. याउलट, 26 फेब्रुवारीला पाकिस्तानच्या खैबर पख्तुनखवा प्रांतातील बालाकोटमधील दहशतवादी तळांवर भारतीय हवाई दलाने हल्ले केले होते.

Leave a Comment