मंगळावर सर्वप्रथम पडू शकते महिलेचे पाउल- नासा

mars
अमरीकी अंतराळ संशोधन संस्था नासाने मंगळ ग्रहावर सर्वप्रथम महिला अंतराळवीराचे पाउल पडू शकेल अशी शक्यता व्यक्त केली आहे. नासाचे प्रशासक ब्राईदेनस्टीन यांनी साय्स्न्स फ्रायडेया रेडीओ कार्यक्रमात एका मुलाखतीत हे विधान केले. मात्र ही महिला कोण असेल याचा खुलासा त्यांनी केला नाही.

या मुलाखतीत चंद्रावरच्या आगामी मोहिमेत महिला चांद्रवीर असेल काय असा प्रश्न त्यांना विचारला गेला तेव्हा त्यांनी आगामी चान्द्रमोहीमेत चंद्रावर उतरणारी व्यक्ती महिला असेल असे सांगितले आणि मंगळावर पडणारे पहिले मानवी पाउल महिलेचे असू शकते असे स्पष्ट केले. ते म्हणाले नासाने आगामी अंतराळ मोहिमात महिलांना अधिक प्राधान्य दिले असून त्यांना प्रायोरिटी दिली आहे.

या महिनाखेर नासाचा पहिला स्पेसवॉक होत असून त्यात सर्व महिला सामील आहेत. अंतराळवीर एने मेकक्लेन व क्रिस्टीना कोच स्पेस वॉक करणार आहेत आणि त्यांना सहाय्य करणाऱ्यात महिला कंट्रोलर आहेत. मार्च अखेर हा वॉक होणार आहे. त्यामुळे मार्च हा खऱ्या अर्थाने राष्ट्रीय महिला मास असेल असेही ते म्हणाले.

Leave a Comment