टोयोटा बनवितेय चंद्रावर चालणारी कार

jaxa
जपानी कार उत्पादक कंपनी टोयोटा चंद्रावर चालणारी सेल्फ ड्रायविंग कार तयार करत असून तिचे नाव जक्सा लुनर रोव्हर असे आहे. या कारला सहा चाके आहेत आणि त्यातून दोन लोक चंद्रावर १० हजार किमी अंतर जाऊ शकणार आहेत. जपान एरोस्पेस एक्स्प्लोरेशन एजन्सीसाठी ही कार तयार केली जात आहे.

ही कार २०२९ मध्ये चंद्रावर नेण्याची योजना आहे. जपान २०३० मध्ये चंद्रावर अंतराळवीर मोहीम राबविणार आहे त्याअगोदर ही कार चंद्रावर नेली जाईल. चंद्रावर यान उतरले की ही कार स्वतः प्रवाशांच्याजवळ येणार आहे. या कार मध्ये फ्युल सेल टेक्नोलॉजीचा वापर केला गेला असून तिची बॅटरी सौर उर्जेवर चार्ज होणार आहे.

या कारचा आकार दोन मायक्रोबस इतका आहे. तिची लांबी ६ मीटर आहे आणि आणीबाणी आलीच तर त्यातून दोन ऐवजी चार प्रवासी प्रवास करू शकणार आहेत असे कंपनीचे म्हणणे आहे.

Leave a Comment