जिंकलेली लॉटरी हरवूनही त्याने जिंकले १९ अब्ज रूपये

lottery
आपले नशीब आजमवण्यासाठी अमेरिकेतील न्यूजर्सीच्या एका बेरोजगार व्यक्तीने लॉटरीची तिकीटे खरेदी केली होती. पण लॉटरीचा निकाल जाहिर होण्याआधीच त्याची ती तिकीटे हरवली. एवढे होऊन देखील तो तरुण एका रात्रीतच अब्जोधीश झाला.

त्याला ही लॉटरीची एका अनोळखी व्यक्तीने परत केली आणि त्यानंतर आलेल्या लॉटरीचा निकाल पाहिल्यानंतर त्याचे डोळेच पांढरे पडले. कारण त्याने तब्बल २७३ मिलियन डॉलर म्हणजे १९ अब्ज रूपयांचा लॉटरी जॅकपॉट जिंकला होता. मायकल जे. वियर्स्की असे या लॉटरी जिंकणाऱ्या व्यक्तीचे नाव असून आता तो अब्जो रूपयांचा मालक झाला आहे.

याबाबत माहिती देताना वियर्स्की ने सांगितले की, त्याने लॉटरीचा निकाल जाहीर होण्याच्या एक दिवसआधी जी दोन तिकीटे विकत घेतली होती ती त्याच्याकडून हरवली होती. त्याने सांगितले की, माझे लक्ष फोनवर होते. पैसे काढण्यासाठी मी तिकीट काऊंटरवर ठेवले. लॉटरीचा निकाल जाहीर व्हायला केवळ एक दिवस शिल्लक होता.

नंतर काही तास स्टोरमध्ये वियर्स्कीने तिकीटांचा शोध घेतला. नंतर आता तिकीट मिळणार नाही असा विचार करून त्याने हार मानली. दुसऱ्या दिवशी पुन्हा त्याच स्टोरमध्ये तो गेला आणि तेथील कर्मचाऱ्याला हरवलेल्या तिकीटांबाबत विचारणा केली. कर्मचाऱ्याने सांगितले की, एका अनोळखी व्यक्ती तुझी दोन तिकीटे येथे ठेऊन गेला आहे.

वियर्स्कीला लॉटरीच्या निकालाच्या दिवशी काही विचारपूस केल्यावर तिकीटे परत मिळाली. यासंदर्भात independent.co.ukने दिलेल्या वृत्तानुसार, वियर्स्कीला लॉटरीचा निकाल जाहीर झाल्यावर दोन दिवसांपर्यत हे माहीत नव्हते की, तो १९ अब्ज रूपये जिंकला आहे. जेव्हा त्याच्या आईने लॉटरीची चर्चा केली तेव्हा त्याने लॉटरी अॅप पाहिले आणि त्याला कळाले की आपण श्रीमंत झालो आहोत.

Leave a Comment