जखमी जवानांना जीवदान देणारी गोळी डीआरडीओने बनविली

Untitled-1
डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनच्या चिकित्सा प्रयोगशाळेने एक अद्भुत औषध गोळीस्वरुपात तयार केले असून त्यामुळे जखमी जवानांचे प्राण वाचविण्यास मोलाची मदत मिळणार आहे. युद्ध काळात अथवा दहशतवादी हल्ल्यात जखमी झालेल्या जवानांना उपचार मिळण्यास उशीर झाला तर त्यातील ९० टक्के जवान शहीद होतात. त्यात जादा रक्तस्त्राव झाल्याने मृत्यू येण्याचे प्रमाण अधिक असते. त्यासाठी हे काँबॅट कॅज्यूलीटी ड्रग फार उपयुक्त आहे असे सांगितले जात आहे.

aushadh
या संदर्भात डीआरडीओ मधील लाईफ सायन्स विभाग प्रमुख ए. के. सिंग यांनी सांगितले, युद्ध अथवा दहशवादी हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या जवानांना हॉस्पिटल मध्ये नेण्यात व उपचार सुरु होण्यात जो वेळ जातो त्याला गोल्डन अवर म्हणजे अतिशय महत्वाचा आणि नाजूक काळ म्हटले जाते. त्या वेळात जखमी जवानांना हि गोळी दिली जाईल. त्यामुळे रक्तस्त्राव होत असलेले घाव भरून येतील. या गोळीत औषध, ड्रेसिंग व ग्लीसरेटेड सलाईन आहे. जंगल, अति उंचावरील जागा, युद्ध, दहशदवादी हल्ला यामुळे झालेल्या जखमातून हि गोळी जवानाला वाचवू शकेल. यामुळे रुग्णालयात नेऊन जखमी जवानावर उपचार सुरु होईपर्यंत या गोळीमुळे जवान तग धरू शकतील व परिणामी त्यांचे प्राण वाचतील असे समजते.

Leave a Comment