पाकिस्तान चीनला भारत सरकारचा असाही झटका

malmatta
पाकिस्तानात हवाई हल्ले करून पुलवामा हल्ल्याचा हिशोब चुकता करणाऱ्या केंद्र सरकारने पाकिस्तान आणि चीन या शत्रूराष्ट्रांना आणखी एक झटका दिला आहे. पाक आणि चीनी नागरिकांच्या भारतात असलेल्या मालमत्ता विकण्याची परवानगी केंद्राने राज्य सरकारांना दिली असून या मालमत्ता सुमारे ९४०० कोटींच्या आहेत असे समजते.

फाळणीनंतर पाकिस्तानात स्थायिक झालेले तसेच १९६२ च्या भारत चीन युद्धानंतर भारत सोडून चीन मध्ये गेलेल्या नागरिकांच्या या मालमत्ता आहेत. त्या आजपर्यंत सार्वजनिक वापरासाठी अथवा सर्वसामान्य नागरिकांसाठी खुल्या नव्हत्या. या मालमत्तांची अंदाजे किंमत ९४०० कोटी तर या शत्रू राष्ट्रांचे ३ हजार कोटी मूल्यांचे शेअर भारतात आहेत. केंद्रीय गृह मंत्रालयाने त्याची विक्री करण्याबाबतची अधिसूचना जारी केली आहे. यासाठी शत्रू संपत्ती आदेश २०१८ मध्ये आवश्यक बदल केले गेल्याचे समजते.

या मालमत्ता सध्या पडून आहेत. त्यातील ४९९१ मालमत्ता उत्तर प्रदेशात, २७३५ पश्चिम बंगालमध्ये, ४८७ दिल्लीत आहेत. या पाकिस्तानांत गेलेल्या लोकांच्या मालमत्ता आहेत. चीन मध्ये गेलेल्यांच्या मालमत्ता मेघालय मध्ये ५७, बंगाल मध्ये २९ तर ७ आसाम राज्यात आहेत.

Leave a Comment