नक्की काय आहे निवडणूक आचारसंहिता?

conduct
रविवारी निवडणूक आयोगाने देशात लोकसभा निवडणूक वेळापत्रक जाहीर केले आणि त्याचबरोबर आचारसंहिता लागू केली. अनेकांना आचार संहिता म्हणजे नक्की काय असते याची माहिती नसते. आचारसंहिता म्हणजे निवडणूक जाहीर झाल्यापासून ते निवडणूक निकाल जाहीर होईपर्यंत पाळावयाचे काही नियम आहेत. ते सर्वानाच लागू असतात आणि ते पाळणे बंधनकारक असते. अन्यथा तुरुंगवास होऊ शकतो.

या नियमानुसार राजकीय पक्ष अथवा राजकीय नेते सार्वजनिक पैशाचा वापर पक्ष, स्वतःच्या फायद्यासाठी करू शकत नाहीत. असा प्रकार आढळला तर कारवाई केली जाते. या काळात सरकारी गाड्या, बंगले, घरे याचा वापर प्रचारासाठी करता येत नाही. असे करणे अथवा मतदारांना पैसे वाटणे, दान, देणग्या देणे हे प्रकार करता येत नाहीत. तसे ते घडले तर नियमाचे उल्लंघन मानले जाते. या काळात कोणत्याची नव्या सरकारी योजना सुरु करता येत नाहीत तसेच त्या जाहीर करता येत नाहीत. प्रचार सभा घेण्याअगोदर निवडणूक आयोगाची परवानगी घ्यावी लागते.

सर्वसामान्य लोकांसाठीही आचारसंहितेचे नियम लागू होतात. त्यात कुणाकडे शस्त्र तर ते सरकारकडे जमा करावे लागते. शस्त्र जमा न करता तसेच जवळ ठेवले तर तुरुंगवास होऊ शकतो. सोशल मिडीयावर निवडणूक संदर्भात पोस्ट टाकल्या तसेच व्हॉटसअपचा वापर कुणा व्यक्ती अथवा राजकीय पक्ष यांना मत देण्यसाठी उद्युक्त करण्यासाठी केला तरी तुरुंगवास होऊ शकतो.