मुलीने दिला नकार, म्हणून होणाऱ्या जावयासोबत सासूच झाली फरार

bride
कानपूर – एक अजबच घटना उत्तर प्रदेशच्या कानपूर जिल्ह्यात घडली आहे. या ठिकाणी ऐनवेळी एका लग्नसमारंभात वधूने लग्नासाठी नकार दिला. सर्व काही सुरळीत होते. पण होणाऱ्या पतीचा चेहरा पाहताच वधूने वरमाला फेकून दिली. तसेच आपली फसवणूक झाल्याचे सांगितले. त्या मुलीच्या आईसह समस्त कुटुंबियांनी तिला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. पण, तिने कुणाचे काहीच ऐकले नाही. मग, जे घडले त्यावर कुणालाच विश्वास बसेनासे झाला. लग्नाला मुलीने नकार दिल्यानंतर चक्क तिची आईच आपल्या होणाऱ्या जावयासोबत फरार झाली. कानपूरच्या सचेंडी, भिसार गावात ही घटना घडली आहे.

भिसार गावातील 17 वर्षांच्या मुलीने नुकतीच 12 वीची परीक्षा दिली. तिचा तिच्या आईने विवाह आग्रा येथे राहणाऱ्या आपल्या चुलत नणंदेच्या मुलाशी निश्चित केला होता. नवरदेव 10 मार्च रोजी ठरल्याप्रमाणे वऱ्हाड घेऊन तिच्या घरी पोहोचला. पण, मुलीने ऐनवेळी लग्नास नकार दिला. जो फोटो दाखवून मंजुरी मिळवली तो दुसऱ्याच तरुणाचा होता. आता आपल्यापेक्षा दुप्पट वयाचा लग्नात आलेला माणूस असल्याचे तिने सांगितले. अशा स्वरुपाच्या फसवणुकीनंतर या म्हाताऱ्याशी लग्न करणार नाही असे मुलीने स्पष्ट केले. खूप मोठा वाद लग्नमंडपात झाला. लग्नाच्या मंडपातून मुलगी बाहेर पडली. सगळेच तिला समजावून सांगत होते.

मुलीने लग्नाला नकार दिल्यानंतर लग्न रद्द करण्यात आले. आप-आपल्या घरी सगळेच निघाले. पण, मुलीच्या आईने दुसऱ्याच दिवशी सर्वांना धक्का दिला. आपल्या होणाऱ्या जावयासोबत ती आग्रा येथे पसार झाली. मुलीने सांगितल्याप्रमाणे, तिच्या वडिलांचे तीन वर्षांपूर्वी निधन झाले होते. घरातील सर्वात मोठी मुलगी ती होती. तिला एक भाऊ आणि बहिण सुद्धा आहेत. नातेवाइकांनी यानंतर चौकशी केली तेव्हा मुलीच्या आईलाच तो मुलगा पसंत होता असे समोर आले. आपल्या मुलीने नकार दिल्यानंतर तिला त्या मुलावर दया आली होती. त्याच दरम्यान तिने स्वतःच त्याच्याशी विवाह करण्याचा निर्णय घेतला.

Leave a Comment