
मुंबई – काँग्रेससोबतची संभाव्य आघाडी तोडल्याची घोषणा बहुजन वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी मंगळवारी केली. राज्यातील सर्व ४८ जागांवरील उमेदवारांच्या नावाची घोषणा येत्या १५ तारखेला करणार असल्याचेही त्यांनी जाहीर केले.
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसशी कोणतीही हातमिळवणी नाही – प्रकाश आंबेडकर
त्यांनी यावेळी माध्यमांशी बोलताना काँग्रेसबरोबरचे सर्व प्रस्ताव संपले, असे सांगितले. दरम्यान, सोमवारी त्यांनी सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातून लढणार असल्याचे जाहीर केले होते. त्यांच्या उमेदवारीमुळे माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्यासमोरील अडचणीत वाढ झाल्याचे बोलले जात आहे.
