काम करता येथे मिळत आहे गलेलठ्ठ पगार, करणार का मग ?

job
तुम्हाला जर कोणी असे सांगितले की तु काही काम करु नको पण तुला लाखो रुपये पगार देतो, तर तुम्हाला आकाश ठेंगणे होण्यासारखेच आहे. मग तुम्ही आता असे म्हणाल की माझा पेपरचे डोके ठिकाणावर नाही, काही पण बातम्या देता. पण हे खरे आहे. जगात एक असा देश आहे जेथे तुम्हाला 1.62 रुपये पगारासोबतच वेगवेगळ्या सुट्ट्या आणि नोकरीशी संबंधित सर्व भत्ते व सुविधाही देण्यात येत आहेत.

यासंदर्भातील वृत्त नवभारत टाईम्सने दिले असून त्यांनी दिलेल्या वृत्तानुसार स्वीडनमध्ये सध्याच्या घडीला प्रायोगिक तत्वावर एक आर्ट प्रोजेक्ट सुरू असून त्याला सरकारकडून आर्थिक सहाय्य केले जात आहे. ही नोकरी स्वीडनमधील गोथनबर्ग या शहरात आहे. पण नोकरीचे एक वैशिष्ट्य असे आहे की या नोकरीसाठी केवळ एकाच व्यक्तीला निवडले जाणार आहे. ज्या व्यक्तीची या नोकरीसाठी निवड होईल त्याला एका रेल्वे स्टेशनवर रहावे लागणार आहे. या स्टेशनचे सध्या काम सुरू आहे. जर तुम्ही अजूनही याच विचारात असाल की, अशी कशी काहीच काम करता एवढ्या गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळणार? तर आधी त्याची पूर्ण माहिती जाणून घ्या.

निवडल्या जाणाऱ्या व्यक्तीला दिवसभरात केवळ एकच काम करायचे आहे. एक घड्याळ या काम सुरू असलेल्या स्टेशनवर आहे. त्या व्यक्ती केवळ या घड्याळावरील एका बटनला दाबायचे आहे. ज्यामुळे स्टेशनवरील सर्व फ्लोरोसेंट बल्ब सुरू होतील. याचा अर्थ असा होतो की, ती व्यक्ती त्या दिवशी स्टेशनवर होती. एकंदर काय तर हे अटेंडससारखं काम आहे. बाकी यानंतर हा व्यक्ती दिवसभर काहीही करू शकतो. या व्यक्तीला शिफ्ट संपल्यानंतर पुन्हा एकदा घड्याळावरील बटनाला दाबावे लागणार आहे. ज्यामुळे स्टेशनवरील बल्ब बंद होतील.

एकदा बटन दाबल्यानंतर ही व्यक्ती स्टेशनबाहेरही जाऊ शकते. दिवसभर काहीही करू शकते. तसेच ही व्यक्ती कधीही नोकरी सोडू शकतो किंवा आपल्या जागी तो दुसऱ्या व्यक्तीलाही कामावर ठेवू शकतो. आयुष्यभरासाठी ही नोकरी मिळणार आहे. व्यक्तीला या बदल्यात महिन्याकाठी २३२० डॉलर एवढा पगार दिला जाणार आहे. त्यासोबतच पेंशन फंड, सुट्टी आणि दुसऱ्या सुविधाही मिळणार आहेत.

Leave a Comment