लोकसभा निवडणुकीचा प्रचार करणार रिषभ पंत

rishabh-pant
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीच्या वेळी भारताचा क्रिकेटपटू रिषभ पंत आपल्या नव्या इनिंगला सुरुवात करणार आहे. तो यंदाच्या निवडणुकीत चक्क प्रचार करणार आहे. निवडणूक आयोगाने दिल्लीतील मतदारांना मतदानासाठी प्रोत्साहित करण्यासाठी रिषभ पंतची ब्रॅण्ड ऍम्बेसेडरपदी नियुक्ती केली आहे. रिषभ पंतसोबतच टेबल टेनिस खेळाडू मनिका बत्राचीही ब्रॅण्ड ऍम्बेसेडर म्हणून निवड झाली आहे. हे दोन्ही खेळाडू देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये मतदारांना मतदान करण्याचे आवाहन करतील. दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी रणबीर सिंग यांनी ही माहिती दिली आहे.

रेडियो आणि व्हिडिओच्या माध्यमातून रिषभ पंत आणि मनिका बत्रा नागरिकांना मतदानाबाबत जागरुक करतील. मतदार मतदान केंद्रापर्यंत मोठ्या प्रमाणात यावेत, यासाठी निवडणूक आयोगाने हे पाऊल उचलले आहे. ११ एप्रिल ते १९ मे या कालावधीत लोकसभा निवडणुका ७ टप्प्यांमध्ये होतील. १२ मे रोजी सहाव्या टप्प्यात दिल्लीमध्ये मतदान होईल. कमी कालावधीमध्ये रिषभ पंतने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मोठे नाव कमावले आहे. तर २३ वर्षांच्या मनिकाने २०१८ सालच्या कॉमनवेल्थ गेममध्ये महिला सिंगलमध्ये सुवर्ण पदक पटकावले होते.

Leave a Comment