उत्तर कोरियात निवडणूक निकालांपूर्वीच घोषित केला जातो विजेता

kim-jong-un
प्योंगयंग – उत्तर कोरियात पुन्हा एकदा राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक झाली. जगभरात या प्रक्रियेला लोकशाही निवडणूक असल्याचे दाखवले जात असले तरीही परिस्थिती सर्वांसमोर उघड आहे. पुन्हा सत्ताधारी वर्कर्स पार्टीचे नेते आणि ‘डेमोक्रेटिक पीपुल्स रिपब्लिक ऑफ कोरिया’ अर्थात उत्तर कोरियाचे देशाचे सर्वोच्च नेते किम जोंग उन नेते होणार हे पूर्वनियोजित होते. तरीही प्रत्येकी पाच वर्षांसाठी फक्त दाखवण्यासाठी ‘सुप्रीम पीपल्स असेंबली’च्या निवडणुका आयोजित केल्या जातात.

यंदा देखील उत्तर कोरियात ‘एकनिष्ठ एकता’ अशा घोषणा दिल्या जात आहेत. केवळ एकच नाव मतदानाच्या वेळी मतपत्रिकेवर असते. तरीही त्या उमेदवाराला मतदान करण्यासाठी लोक पोलिंग बूथवर जातात. मतदारांना यामध्ये ते एकमेव नाव खोडण्याची संधी दिली जाते. पण तसे आतापर्यंत कुणीही केलेले नाही. सरकारी वृत्तवाहिनीवर रविवारी संध्याकाळी सहा वाजता बातम्या जारी करण्यात आल्या. त्यानुसार, आपल्या मतदानाचा सर्वांनीच अधिकार बजावला आहे. जे परदेशात आहेत त्यांनी मतदान केले नाही.

यापूर्वी 2014 मध्ये उत्तर कोरियात राष्ट्राध्यक्ष निवडणूक झाली होती. मतदानाचा आकडा त्यावेळी 99.97 टक्के होता. येथे नेहमीच जवळपास शंभर टक्के मतदानाचा रेकॉर्ड आहे. ज्या शून्य पॉइंट काही लोकांनी मतदान केले नाही ते देशाबाहेर होते असे सांगण्यात आले. दुसऱ्या कुठल्याही देशात उत्तर कोरियात होणाऱ्या निवडणुकी पाहायला मिळणार नाहीत. त्यातही सामान्य नागरिकांच्या मनात देशभक्तीच्या नावाने नेत्याची भक्ती भरलेली असते. एकमताने आपल्या नेत्याला जिंकून द्यावे अशी भावना त्यांच्या मनात जागृत केली जाते. देशात असा एकही व्यक्ती सापडणार नाही जो या नेत्याच्या नावाला विरोध करेल.

Leave a Comment