हे दोन अॅप डिलीट केले नाही तर व्हॉट्सअॅप बंद करणार तुमचे अकाउंट

whatsapp1
तरुणाईच्या गळ्यातील ताईत असलेल्या व्हॉट्सअॅपच्या नावाने अनेक प्रकारचे फेक अॅप्स सुरू असून त्यापैकी GBWhatsApp आणि WhatsApp Plus हे दोन्ही अॅप फेक आहेत. ऑटो रिप्लाय, व्हॉट्सअॅप स्टोरी सेव्हिंग आणि डाउनलोड या फीचर्ससह हे दोन्ही अॅप येतात. आता अशा अॅप वापरणाऱ्या ग्राहकांना व्हॉट्सअॅपने सतर्क केले आहे. ज्यांनीही अशा प्रकारचे अॅप वापरले यापुढे त्यांचे व्हॉट्सअॅप अकाउंट बंद केले जाणार आहे. आपल्याला व्हॉट्सअॅप अकाउंट बंद झाल्याचे मेसेज सुद्धा पाठवले जातील. या मेसेजमध्ये फेक अॅप वापरल्यामुळे आपले खाते बंद झाल्याचे कळवले जाईल. अशात पुन्हा अकाउंट सुरू करण्यासाठी आपल्याला फेक व्हॉट्सअॅप मोबाईलमधून अनइंस्टॉल करून नव्याने अधिकृत व्हॉट्सअॅप अॅप इंस्टॉल करावे लागणार आहे. आपण अशा पद्धतीने पुन्हा आपले मेसेजिंग अकाउंट सुरू करू शकता.

याबाबत व्हॉट्सअॅपने जारी केलेल्या माहितीनुसार, हे दोन्ही अॅप फेक आणि मॉडिफाइड आहेत. कुठल्याही प्रकारच्या सायबर सुरक्षेची खात्री ते ग्राहकांना देत नाहीत. व्हॉट्सअॅप कंपनीच्या नियमांचे असे अॅप्स उल्लंघन करतात. आपल्या ग्राहकांना व्हॉट्सअॅपने हे दोन्ही अॅप वेळीच मोबाईलमधून काढण्याचा इशारा दिला आहे.

कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, पुन्हा ओरिजन अॅपवर अकाउंट सुरू होण्यापूर्वी किंवा आपले खाते बंद होण्यापूर्वी चॅट हिस्ट्रीचा बॅक-अप करून घ्यावा. बॅक-अप घेण्यासाठी तात्पुरत्या बंदीचा कालावधी संपण्याची वाट पाहा. टायमर आपल्याला सांगणार की ही बंदी कधी उठणार आहे. यासाठी GB WhatsApp मध्ये More options – chats – back up chats वर जावे. त्यानंतर आता फोन सेटिंग्समध्ये tap storage – Files वर जावे व GB WhatsApp च्या फोल्डरमध्ये जाऊन ते सिलेक्ट करावे. अप्पर राइट कॉर्नरमध्ये रीनेम आणि रीनेम फोल्डर असे दोन पर्याय दिसतील. आता प्ले स्टोअरवर जाऊन व्हॉट्सअॅपचे अधिकृत अॅप डाउनलोड करा. व्हॉट्सअॅपमध्ये आपले ऑफिशियल नंबर व्हेरिफाय केले जाईल. आता बॅक-अपला रीस्टोअर करण्यासाठी ऑप्शन येईल. यावर क्लिक करताच चॅट फोनमध्ये येईल.

Leave a Comment