छोट्या पडद्यावरुन काही काळासाठी एक्झिट घेणार अमोल कोल्हे

amol-kolhe
छोट्या पडद्यावरील ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ या मालिकेद्वारे घराघरात पोहचलेले अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांचीही प्रतिमा प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय असून त्यांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्यामुळे अमोल कोल्हे यांनी ही मालिका पूर्ण झाल्यानंतर काही काळ अभिनयातून विश्रांती घेणार असल्याचे म्हटले आहे.

अलिकडेच नाशिकच्या मालेगाव येथे डॉ. अमोल कोल्हे हे गेले होते. अमोल कोल्हे यांना बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांच्या १५६ व्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात सयाजी रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी या कार्यक्रमादरम्यानच काही काळ मालिकेतून विश्रांती घेत असल्याचे सांगितले.

त्यांच्या या घोषणेमुळे चाहत्यांमध्ये ते ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ मालिकेतून बाहेर पडत असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. पण, सध्यातरी ही मालिका अमोल कोल्हे हे सोडणार नाहीत. सयाजीरावांच्या जीवनावर एखादी मालिका, नाटक किंवा चित्रपटात अमोल कोल्हे यांनी भूमिका साकारण्याचेही आश्वासनही चाहत्यांना दिले आहे.

Leave a Comment