मुलाच्या भाजप प्रवेशामुळे राधाकृष्ण विखेंवर होऊ शकते कारवाई

radhakrishna-vikhe
अहमदनगर – आज भाजपमध्ये राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचा मुलगा डॉ. सुजय हे प्रवेश करणार असून या पार्श्वभूमीवर काँग्रेस राधाकृष्ण विखे यांच्यावर कारवाई करण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. भाजपमध्ये डॉ. सुजय गेल्याने जनतेसमोर काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते काय भूमिका मांडणार? त्यातून पक्षाचे मोठे नुकसान होणार असेच चिन्ह असल्याने काँग्रेस श्रेष्ठी विखे यांच्यावर कारवाई करण्याची शक्यता आहे.

विखे यांनाही या परिस्थितीत भाजपचीच वाट धरण्याशिवाय पर्याय राहणार नाही. पण संपूर्ण विखे परिवाराची राजकीय कारकीर्द पुत्र डॉ. सुजय यांच्या हट्टासाठी पणाला लावायची की संघर्षाची परंपरा कायम ठेवत आपले अस्तित्व अधोरेखित करायचे, या द्वंदात आता प्रवरा-लोणीकर अडकलेले आहेत.

राधाकृष्ण विखे यांना डॉ. सुजय यांच्या भाजप प्रवेशाने काहीतरी निर्णय घेणे क्रमप्राप्त असणार आहे. ते पक्ष कारवाई करण्याअगोदर विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देऊ शकतात. एकूणच निवडणूक प्रक्रियेपासून राज्य स्तरावर दूर राहून काँग्रेसमध्येच ते राहू शकतात किंवा थेट नाराजी व्यक्त करत पदाचा आणि काँग्रेस पक्षाच्या सद्स्यत्वाचा राजीनामा देत भाजपमध्ये प्रवेशही करू शकतात.

Leave a Comment