निवडणूक आयोगाने लाँच केले cVIGIL अॅप, त्यात करु शकला मतदान संदर्भातील तक्रार

app
भारतीय निवडणूक आयोगाने 2019च्या लोकसभा निवडणुका जाहीर केल्या आहेत. एकूण 7 टप्प्यांत 2019च्या लोकसभा निवडणुका पार पडणार आहेत. निवडणूक आयोगाने या वेळी cVIGIL मोबाइल अॅप लाँच केले आहे. ज्याच्या माध्यमातून देशभरातील मतदार त्यांच्या मतदारसंघात होत असलेल्या गडबडीची तक्रार चुटकीसरशी करु शकतील आणि विशेष म्हणजे तक्रार केल्याच्या 100 मिनिटातच त्यावर कारवाई केली जाणार आहे. चालू असलेल्या गडबडीचा पुरावा म्हणून मतदार फोटो आणि व्हिडिओ देखील पाठवू शकतात. म्हणून या अॅपच्या वैशिष्ट्यांबद्दल जाणून घेऊ.
app1
सर्वप्रथम आम्ही आपल्याला सागू इच्छितो की हे अॅप भारतीय निवडणूक आयोगाचे अधिकृत अॅप आहे. या अॅपला cVIGIL असे नाव देण्यात आले आहे. हे आपण आपल्या Android फोनमध्ये आपल्या Google Play Store वरुन डाउनलोड करू शकता. या अॅपमध्ये, आपल्याला मोबाइल नंबरसह काही माहितीची नोंदणी करावी लागेल. या अॅपसह आपण थेट आपल्या फोनचा कॅमेरा उघडू शकता आणि व्हिडिओ रेकॉर्ड करू शकता आणि फोटो क्लिक करू शकता.
app2
या अॅपमध्ये, आपण कोणत्या लोकेशनला गोंधळ सुरु आहे याची देखील माहिती देऊ शकता. उदाहरणार्थ, पैसे देऊन मत खरेदी केले जात आहेत. त्यामध्ये आपल्याला एक डिस्क्रिप्शन बॉक्स देखील मिळेल ज्यात आपण संपूर्ण माहिती टाइप करू शकता.
app3
एखाद्या घटनेबद्दलची संपूर्ण माहिती प्रदान केल्यानंतर आपण ते सबमिट करू शकता. त्यानंतर, आपण किती तक्रारी केल्या आहेत आणि किती तक्रारींवर कारवाई केली गेली आणि किती अयशस्वी झाले हे आपल्या पाहता येणार आहे. त्याचवेळी, आपल्या तक्रारीची कोण दखल घेत आहे याची देखील माहिती आपणास देण्यात येणार आहे.

Leave a Comment