सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हेच मसूद अजहरच्या सुटकेचे ‘डील मेकर’

rahul-gandhi
नवी दिल्ली – जम्मू-काश्मिरच्या पुलवामा येथे मागील महिन्यात सीआरपीएफ जवानांवर झालेल्या हल्ल्याला जैश-ए-मोहम्मद जबाबदार असल्याचे उघड झाले आहे. त्यातच आता काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी यावरुन पंतप्रधानांवर निशाणा साधला आहे. १९९९ मध्ये भारताच्या कैदेतून ‘जैश’चा म्होरक्या मसूद अजहरची सुटका कोणी केली होती, हे पुलवामातील त्या शहीद जवानांच्या कुटुंबियांना मोदींनी सांगावे, असे म्हटले आहे.


१९९९ मध्ये मसूदच्या सुटकेवेळचे अजित डोभाल यांचे काही फोटो देखील राहुल गांधी यांनी ट्विट केले आहेत. डोभाल यांना त्यांनी यामध्ये डील मेकर असे संबोधले आहे. तसेच भारताच्या कैदेतून पुलवामातील जवानांचा मारेकरी मसूद अजहरची सुटका करणारे कोण होते. याचे सध्याचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार हेच ‘डील मेकर’ आहेत. मोदींनी हे ही जवानांच्या कुटुंबियांना सांगावे असे राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Leave a Comment