किमजोंग उनचे वडील, आजोबांच्या प्रेतरक्षणासाठी कोट्यावधीचा खर्च

kimjong
उत्तर कोरिया हा देश तेथे नागरिकांवर असलेली अनेक बंधने, अण्वस्त्रे, उपाशी लोक अश्या अनेक मुद्द्यांवरून जगात चर्चेत असतो तसेच हा देश त्यांचा नेता तानाशाह किम जोंग उन याच्या सणकीपणामुळेहि नेहमीच चर्चेत असतो. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशाला आव्हान देण्याची हिम्मत किम जोंग दाखवतो याचे अनेकांना कौतुक आहे. मात्र आर्थिक चणचण सोसणाऱ्या या देशात किम जोंग उनचे वडील किम जोंग इल आणि आजोबा किम जोंग इल सुंग यांची प्रेते सुस्थितीत जतन करण्यासाठी दरवषी कोट्यावधींचा खर्च केला जातो.

मिळालेल्या माहितीनुसार या दोन नेत्याची प्रेते देशात जतन केली गेली असून त्यासाठी कुलसुसन मेमोरिअल ही राजवाड्यासारखी भव्य इमारत बांधली गेली आहे. रशियन लॅब लेनिन यांच्याकडे ही प्रेते जतन करण्याची जबाबदारी आहे. या महालात दर्शनासाठी येणाऱ्याना तीन वेळा या प्रेतांसमोर झुकावे लागते.

येथे रात्रंदिवस शेकडो जवान पहारा देतात. ज्या रशियन लेनिन लॅब कडे या प्रेतांच्या जतनाचे काम आहे त्यांनी १९२४ मध्ये रशियाचा क्रांतिकारी नेता लेनिन याच्या शवाचे जतन केले होते. त्यासाठी या शवांचे एम्बोसिंग केले जाते. यामुळे प्रेत लवचिक राहते आणि त्वचा तजेलदार दिसते. ही प्रक्रिया करण्यासठी बराच वेळ लागतो आणि दर दोन वर्षांनी ती केली जाते. त्यासाठी सुमारे २ लाख डॉलर्स म्हणजे १ कोटी ४१ लाख रुपये खर्च येतो असे मास्कोमधून प्रसिद्ध झालेल्या एका अहवालात नमूद केले गेले आहे.

Leave a Comment