ऑनर मॅजिक टू थ्रीडी लाँच

honormagic
चीनी स्मार्टफोन कंपनी हुवावेचा सबब्रांड ऑनरने त्यांचा नवा स्मार्टफोन ऑनर मॅजिक टू थ्रीडी चीनमध्ये लाँच केला असून ऑनरला भारतात ग्राहकांकडून मिळत असलेल्या प्रतिसाद लक्षात घेता हा फोन लवकरच भारतीय बाजारात येईल असे समजते. या फोनला अनेक खास फीचर्स दिली गेली असून चीनमध्ये तो ६० हजार रुपयात मिळणार आहे.

सुरक्षेसाठी या फोनला थ्रीडी स्कॅनर दिला गेला आहे. ६.४ इंची एचडी ओलेड स्लायडर डिस्प्ले हे त्याचे वैशिष्ट आहे. ८ जीबी रॅम, ५१२ जीबी इंटरनल स्टोरेज, अँड्राईड ९.० पाय, ४० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ३४०० एमएएच बॅटरी, लॉक अनलॉकसाठी फिंगरप्रिंट सेन्सरसह थ्रीडी फेस स्कॅनर दिला गेला असून तो १० हजार फेशियल पॉइंट चेक करून फोन अनलॉक करतो.

या फोनला स्लायडिंग मेकॅनिझम मुळे फ्रंट नॉच नाही. रिअरला व्हर्टिकल ट्रिपल कॅमेरा सेट दिला गेला असून त्यातील प्रायमरी कॅमेरा १६ एमपीचा, दुसरा २४ एमपीचा तर तिसरा अल्ट्रावाईड अँगलसह आहे. फ्रंट कॅमेरा १६ एमपीचा असून तो स्लायडरस्क्रीनच्या खाली दिला गेला आहे. तो वापरायचा असेल तर डिस्प्ले स्लाईड करावा लागणार आहे.

Leave a Comment