कॅडबरी डेअरी मिल्क युरोपात डार्क मिल्क चॉकलेट?

dairy
वर्षानुवर्षे कॅडबरीच्या डेअरी मिल्कचा स्वाद जिभेवर साम्राज्य गाजवत असताना व या चॉकलेटने लोकप्रियतेचे रेकॉर्ड मोडले असताना कॅडबरीने या चॉकलेटसाठी नवीन नावाचे रजिस्ट्रेशन केले असल्याचे समजते. वर्षानुवर्षे पहिली पसंत ठरलेले डेअरी मिल्क युरोपात तरी डार्क मिल्क चॉकलेट नावाने बाजारात आणले जाईल असे सांगितले जात आहे. अर्थात कंपनीने अशी नांवे रजिस्टर करून ठेवण्याची कंपनीची परंपरा असल्याचे सांगून डार्कमिल्क नावाने कोणतेही नवे चॉकलेट बाजारात आणण्यात येणार नसल्याचे कळविले आहे.

अंतर्गत सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार ब्रिटनच्या या कंपनीला डेअरी मिल्क या नावाने जगात सर्वत्र चॉकलेट विकण्यात कांहीच अडचण नव्हती. मात्र ब्रिटन युरोपियन युनियनमधून बाहेर पडल्यानंतर कांही देशांनी या चॉकलेट मध्ये वापरल्या जात असलेल्या कांही घटक पदार्थांवर ऑब्जेक्शन घेतले आहे. यात फ्रान्स, बेल्जियम व इटली या देशांचा समावेश आहे. शुद्धेतेच्या निकषावर या चॉकलेटमध्ये सुधारणा करणे गरजेचे असल्याचे या देशांचे म्हणणे आहे. त्यामुळे कॅडबरी डार्कमिल्क या नावाने नवे चॉकलेट आणणार असल्याचे सांगितले जात आहे.

Leave a Comment