या हॉटलमध्ये केवळ रडण्यासाठी द्यावे लागतात ८३ डॉलर भाडे

hotel
टोकियो – अनेक कारणांसाठी प्रसिद्ध असलेली अनेक हॉटेल आपल्या माहितीत असतील. परंतु, एक हॉटेल असे आहे की ज्यात महिला केवळ रडण्यासाठी येतात, असे आपण ऐकले आहे का ? बहुतेक नसेलच. मात्र जपानमधील टोकियो शहरात एक हॉटेल असे आहे, जेथे महिला केवळ रडण्यासाठी खास रुम बूक करतात. या हॉटेलचे नाव मित्सुई गार्डन, असे आहे. विशेष म्हणजे येथे महिलांना रडण्यासाठी विशेष सुविधाही पुरवल्या जातात.

याबाबत हॉटेलचे व्यवस्थापन दावा करते की, हे अशा प्रकारचे जगातील एकमेव हॉटेल आहे. येथे महिलांना क्राईंग रूम (रडण्यासाठी खोली) उपलब्ध करून दिली जाते. महिलांना आपल्या तणावापासून मुक्ती मिळावी या हेतूने ही सुविधा पुरवली जात असल्याची पुष्टीही हॉटेल व्यवस्थापण जोडते. या हॉटेलमध्ये एका रात्रीचे भाडे ८३ डॉलर (सुमारे ५३२९ रूपये) इतके आकारण्यात येते.
hotel1
या रूममध्ये रडण्यासाठी विशेष सुविधा पुरविण्यात येतात. यात भावनाप्रधान (इमोशनल) चित्रपट, आईमास्क तसेच खास प्रकारचे टिश्युपेपरही दिले जातात. याशीवाय खास शौक असलेल्या महिलांना वाचन करण्यासाठी अशा पद्धतीची कास पुस्तकेही उपलब्ध करून दिली जातात. येथे येणाऱ्या महिलांना हॉटेलच्या वतीने खास मेकप करण्याची आणि तो उतरविण्याचीही खास सुविदा पुरवली जाते. योत्सुई हॉटेलने दावा केला आहे की, जपानमध्ये या हॉटेलला भेट देणाऱ्या महिलांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

Leave a Comment