ही आहेत जगातील पाच सर्वाधिक महाग घरे


पूर्वी राजे राजवाडे याचे वास्तव्य राजवाडे, महालातून असायचे. आजही अनेक ठिकाणी असे राजवाडे पाहायला मिळतात. आता नव्या जमान्यात जगातील नवकोट श्रीमंत भले राजवाडे बांधत नसतील तरी टोलेजंग आणि अतिशय महाग घरे ते नक्कीच बांधतात. अश्या जगातील पाच सर्वात महागड्या घरांची ही माहिती. विशेष म्हणजे यात आपले उद्योजक मुकेश अंबानी आणि भारतीय वंशाचे उद्योजक लक्ष्मी मित्तल याच्या घरांचा समावेश आहे.

बकिंघम पॅलेस –ब्रिटनचा राणीचे हे निवासस्थान जगातील सर्वात महागडे घर असून त्याची किंमत आहे २०,८६२ कोटी रुपये. राणी एलिझाबेथ द्वितीय आणि राजपरिवाराचे हे निवासस्थान. या महालात ७७५ खोल्या,१९ गेस्टरूम्स, ५२ बेडरुम्स, १८८ स्टाफ रूम्स, ९२ ऑफिसेस आणि ७८ बाथरूम्स आहेत.


अन्टेलिया – मुंबईच्या उच्चभ्रू वस्तीतील ही २७ मजली इमारत रिलायंस उद्योगाचे मालक आणि भारतातील सर्वात श्रीमंत मुकेश अंबानी यांचे घर आहे. या घराची किंमत आहे १२ हजार कोटी. ४ लाख चौरस फुटाच्या या इमारतीत ६ अंडरग्राउंड पार्किंग, ३ हेलीपॅड, असून ६०० कर्मचाऱ्यांचा स्टाफ आहे.


विला लियोपोल्डा – फ्रांसमध्ये असलेल्या या घराची किंमत ४८८४ कोटी रुपये आहे. लिली सफारा या प्रसिद्ध फिलोथ्रोपिस्ट च्या मालकीचे हे घर ५० एकरात पसरलेले आहे. त्यात हेलीपॅड, आउटडोर किचन, प्रचंड मोठे गेस्टहाउस, स्विमिंग पूल आहेत.


फोरफेअरफिल्ड पाँड –न्युयोर्क मध्ये असलेल्या या अलिशान घराची किंमत १६१५ कोटी रुपये असून इरा रेनार्त या रेन्डो ग्रुपच्या प्रमुखांच्या मालकीचे आहे. ६३ एकर परिरसरात हे घर आहे. त्यात २९ बेडरुम्स, ३९ बाथरूम्स, बास्केट बॉल, स्क्वॅश, टेनिस कोर्ट, तीन स्विमिंग पूल्स आणि ९१ फुटी लांबीचा डायनिंग हॉल आहे. या घराचा स्वतःचा पॉवर प्लांट आहे.


१८-१९ केसिंग्टन पॅलेस गार्डन – लंडन येथे असलेले हे अलिशान घर स्टील उद्योजक लक्ष्मी मित्तल यांच्या मालकीचे असून त्याची किंमत आहे १४४५ कोटी रुपये. ब्रिटीश युवराज विलियम्स आणि युवराज्ञी केट याच्या घराजवळ ते आहे. या घरात १२ बेडरुम्स, तुर्की बाथरूम्स आणि २० गाड्या पार्क करण्याची सुविधा आहे.

Leave a Comment