‘विराट’सेनेची देशभक्ती पाहून पाकचा झाला तिळपापड

team-india
नवी दिल्ली : शुक्रवारी झालेल्या सामन्यात भारतीय क्रिकेट संघाने पुलवामात झालेल्या हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली म्हणून भारताच्या लष्कराची कॅप घालून मैदानात उतरला. पण भारतीय संघाची ही श्रद्धांजली पाकला चांगलीच झोंबली असून त्यावर आक्षेप घेत भारतीय संघावर कारवाई करण्याची मागणी पाकिस्तानने आयसीसीकडे केली आहे.

याबाबत पाकिस्तानचे मंत्री फवाद चौधरी यांनी ट्विट केले असून त्यांनी त्यामध्ये म्हटले आहे की, हे फक्त क्रिकेट नाही. खेळातून होत असलेल्या राजकारणावर आयसीसी कठोर कारवाई करेल अशी मला आशा आहे. भारतीय संघाने जर असे प्रकार बंद केले नाही तर पाकिस्तान मैदानात काळी पट्टी बांधून उतरेल. काश्मीरमध्ये भारताकडून होत असलेल्या अत्याचाराविरोधात आम्ही आवाज उठवू अशी गरळ पाक मंत्र्यांनी ओकली आहे. त्याचबरोबर याबाबत पाकिस्तान क्रिकेट बोर्डानेही आवाज उठवावा अशी मागणी केली आहे.

भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनीने शुक्रवारी झालेल्या सामन्यात सर्व खेळाडूंना कॅप दिली. भारतीय संघाने पुलवामातील दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांना अशा प्रकारे अभिवादन केले होते. खेळाडूंनी या सामन्याचे मानधनही शहिदांच्या कुटुंबीयांना देण्यात आले. तसेच कर्णधार विराट कोहलीने राष्ट्रीय संरक्षण निधीत देशवासियांनीदेखील मदत करावी असे आवाहन केले होते.

Leave a Comment