पाकिस्तानच्या आयएसआयशी जमात-ए-इस्लामी संघटनेचे लागेबांधे

organaisation
नवी दिल्ली : केंद्र सरकारने नुकतीच ‘जमात ए इस्लामी’ या संघटनेवर बंदी घातली आहे. या संघटनेबाबत गुप्तचर यंत्रणेने धक्कादायक खुलासा केला आहे. या संघटनेचा जम्मू काश्मीर खोऱ्यातील तरूणांना देशविघातक कार्यात सक्रिय करणे, शस्त्र पुरवठा करण्यात हात असल्याचे गुप्तचर यंत्रणेने स्पष्ट केले आहे. पाकिस्तान आणि ‘आयएसआय’शी संघटनेचे घनिष्ठ संबंध असल्याचे उघड झाले आहे. या संघटनेवर याआधी देखील जम्मू आणि काश्मीर सरकारकडून आणि केंद्राकडून बंदी घालण्यात आली होती.

दरम्यान, या संघटनेवर बंदी घातल्याने मेहबुबा मुक्ती यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. पाकिस्तानच्या गुप्तचर एजन्सी आयएसआयशी जमात-ए-इस्लामी संघटना संपर्क ठेवून आहे. पाकिस्तानच्या उच्चायोगासोबत या संघटनेने सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे. जेणेकरुन फुटीरवादी नेत्यांचा संपर्क वाढविण्यासाठी हा प्रयत्न असल्याचे सांगण्यात येत आहे. हुर्रियत काँन्फरन्समध्ये जमात-ए-इस्लामी संघटनेचा प्रमुख सदस्य सैय्यद अली शाह जिलानी कार्यरत आहे.

ही माहिती देताना एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, पाकिस्तानची गुप्तहेर संघटना आयएसआयशी ही संघटना संपर्क साधत असते. जेणेकरून ते काश्मिरी तरुणांना शस्त्रे पुरविण्यासाठी, तरुणांना भडकविण्यासाठी आणि त्यांना प्रशिक्षण देणे आणि आर्थिक पुरवठा करणे शक्य होईल, त्यासाठी जमात ए इस्लामी काम करत असल्याचे पुढे आले आहे. त्याच्या नेत्याचे पाकिस्तानचे नवी दिल्लीस्थित उच्चायोगाशी संपर्क निर्माण झाले होते. त्यावरुन ही संघटना देशाविरोधी कारवाई करताना दिसत होती. त्यामुळे या संघटनेवर बंदी घातलण्यात आली आहे.

Leave a Comment