फोक्सवॅगनची आय.डी बुगी कन्सेप्ट इलेक्ट्रिक कार सादर

buggy
जिनेव्हा येथे सुरु असलेल्या ऑटोशो मध्ये फोक्सवॅगनने त्यांची आयडी बुगी कन्सेप्ट इलेक्ट्रिक कार सादर केली आहे. ही कार तिचे डिझाईन आणि लुक मुळे उपस्थितांच्या आकर्षणाचे केंद्र बनली आहे. मोठे बम्पर, राउंड हेडलाईट आणि बहुतेक सारे कंट्रोल स्टिअरिंग व्हील मध्येच असलेल्या या कारला दरवाजे आणि छत नाही.

जिनेव्हा मोटर शो मध्ये अनेक कंपन्यांनी त्यांच्या इलेक्ट्रिक कार सादर केल्या आहेत. मात्र फोक्सवॅगनची ही कन्सेप्ट कार विशेष आकर्षण ठरली आहे. या कारसाठी ६२ केडब्ल्यूएच बॅटरी दिली असून एका चार्ज मध्ये ती २४९ किमीचे अंतर कटते. ० ते १०० किमी वेग घेण्यासाठी तिला ७०२ सेकंद लागतात आणि तिचा टॉप स्पीड आहे तशी १४० किमी. उन पाउस यांच्यापासून बचावासाठी एक कव्हर दिले गेले असून कारचे इंटिरियर पूर्णपणे वॉटरप्रुफ आहे.

ही कार ऑफरोडही चालविता येणार आहे. कारच्या फ्रंटला दोन लाल हूक्स बम्पर मध्ये बसविले गेले असून ही कार कुठे फसली अथवा टो करायची वेळ आलीच तर हे हुक उपयोगात येणार आहेत. ही कार दोन सीटर आहे मात्र त्यात आणखी दोन सीटसाठी जागा आहे. कारला अॅडीशनल इलेक्ट्रिक मोटार लावण्याची सुविधाही दिली गेली आहे.

Leave a Comment