कच्छच्या या महिलांची शौर्यगाथा आजही चर्चेत

bhuj
भारत पाकिस्तान यांच्यात कोणताही लष्करी तणाव निर्माण झाला की १९७१ साली या दोन देशात झालेल्या युद्धाच्या आठवणी चर्चिल्या जातात तसेच कच्छ मधील ३०० गृहिणी महिलांनी या युद्धात ज्याप्रकारे सेनेची मदत केली त्याची आठवणही आवर्जून निघते. महिला दिनाच्या निमित्ताने पुन्हा एकदा या शूरवीर महिलांची आठवण करणे उचित ठरेल.

या युद्धात पाकिस्तानी हवाई दलाने भारताची लढाऊ विमाने उडू शकता नयेत म्हणून भूज विमानतळावरील हवाई पट्टी बॉम्बफेक करून पूर्ण उध्वस्त करून टाकली होती. त्याला ऑपरेशन चंगेझखान असे नाव दिले गेले होते. त्यावेळी इंदिरा गांधी पंतप्रधान होत्या. रनवे दुरुस्त करणे आणि पुन्हा विमानांचे उड्डाण होण्यास किती कालावधी जाणार यावर यशापयश अवलंबून होते. रनवे च्या दुरुस्तीसाठी लष्कराकडे पुरेसे मनुष्यबळ नव्हते कारण बहुतेकजन युद्धात गुंतले होते. यावेळी कच्छ भागातील ३०० गृहिणी पुढे सरसावल्या आणि त्यांनी अपार कष्ट करून ही धावपट्टी ७२ तासात पूर्ववत करण्यसाठी लष्कराला सहाय्य केले. त्यावेळी या महिलांनी देश सीमा रक्षणासाठी असाधारण साहस आणि दुर्दम्य इच्छाशक्ती दाखविली.

runway
धावपट्टी दुरुस्त झाल्यामुळे भारतीय हवाई दलाची लढाऊ विमाने येथून झेपावू शकली आणि पाकिस्तानला धूळ चारू शकली. या महिलांना त्यांनी दिलेल्या योगदानाबद्दल इंदिरा गांधी यांनी झाशीची राणी उपाधीने गौरविले होते.

धावपट्टी उधवस्त झाल्यावर तत्कालीन कलेक्टर गोपाल गोस्वामी यांनी श्रमदानासाठी आवाहन केले होते आणि त्याला प्रतिसाद देत या ३०० महिलांनी अहोरात्र काम केले होते. भूज साठी या युद्धाच्या आठवणी वाईट आहेत. कारण १४ दिवस सतत पाक विमानांनी हल्ले चढवून ३५ वेळा धावपट्टी उखडली होती. या शूर महिलांपैकी आज ७० जणी हयात असून त्यातील ३५ महिला परदेशात राहत आहेत.

Leave a Comment