या सर्वसाधारण कुत्रीने केली हिमालयावर चढाई

dogggy
हिमालय पर्वत जगभरातील गिर्यारोहकांचे आवडते ठिकाण आहेच पण हिमालयातील विविध उंच शिखरे सर करण्याचे प्रयत्न गिर्यारोहक सातत्याने करत असतात. यात आता एका सर्वसामान्य कुत्रीचा समावेश झाला आहे. टेलीग्राफच्या रिपोर्टनुसार मेरा नावाच्या सर्वसामान्य कुत्रीने हिमालयात २३,२८९ फुटांवर यशस्वी चढाई केली आहे.

mera
अर्थात मेराने ही चढाई एका गिर्यारोहक टीम बरोबर केली मात्र तिला त्यासाठी कोणतेही प्रशिक्षण दिले गेले नव्हते तसेच कोणत्याही सपोर्टशिवाय तिने २३,२८९ फुटांची उंची गाठली. ती या काळात गिर्यारोहकांच्या तंबूत राहिली आणि त्यांनी खाल्ले तेच अन्न तिने घेतले. हा प्रवास १० दिवसांचा होता. व्यावसायिक माउंटन गाईड म्हणून काम करणारे डॉन वागोवस्की म्हणाले सुरवातीला मेरा इतक्या थंडीत मरून जाईल अशी भीती आम्हाला वाटत होती. पण ती जगली आणि जिंकलीही. ती खरोखरच विशेष कुत्री असली पाहिजे.

हिमालयन डाटा बेस या संस्थेकडून मिळालेल्या माहितीनुसार यापूर्वी अनेक कुत्री एव्हरेस्ट बेस कॅम्पपर्यत गेली आहेत मात्र २३ हजार फुट उंचीवर अजून कुणी कुत्री गेलेली नाहीत.

Leave a Comment